तोडले संबंध इतके जाहलेतोडले संबंध इतके जाहले
आणखी डोकयातले तण वाढले

काळ हा इतिहास हा की दु:ख हे
आपल्या वर्षांमधे जे तुंबले

व्हायचे जे तेच झाले शेवटी
केवढे जन्मावरी घण घातले

येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले

रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले

सावल्यांनो संपवा आतातरी
वैर जे आजन्म होते पाळले....

-- अनंत ढवळे

प्रतिसाद

येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले

छान...
रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले
उत्तम...