माणसे

प्रेमवेडी संत मोठी छान होती माणसे
खानदानी काळ्जाचे भान होती माणसे


आणभाका घेवुनीया पाळणारे कोण हो
टाळ्वाली पांडुरंगी  ध्यान होती माणसे


पावसाची सावकारी फार वेळा पाहिली
पीकपाणी जाळ्णारी रान होती माणसे


आठवांनी मंद झाला श्वास माझा केवढा
सोंगटीचे शेवटाचे दान होती माणसे


लेकरांना कोण नेई रोज मंदिराकडे
देउळाला पायरीचा मान होती माणसे -  बापू दासरी  bapu111@gmail.com

गझल: 

प्रतिसाद

बापू  आपण गझल लिहिता असे कुणीतरी म्हणाले होते.... 
पण कविताही छान लिहिता की तुम्ही .... सुरेख कविता आहे.
यान,पान, बान, कान, आन,तान, इरफान ,सलमान, इमरान, बलवान  अशी किती तरी यमके बाकी आहेत. अजून लिहा की , कविता कशी मोठी हवी !

आपला गझलेचा अभ्यास दांडगा दिसतो -  वरील गझलेतील दोष दाखविल्यास किंवा वरील गझल ही गझल नाही हे जरा सांगितले तर आपल्या वयाचा आणि ज्ञानाचा मान राहिल्-बापू

छानच कविता आहे. पण गझले बाबत काय बोलणार या रचनेवर ? तशी प्रत्येक गझल ही कविता असतेच की नाही ?
मला वाटते या उत्तराने तुमचे समाधान होईल समजा नाहीच झाले तर सोडून द्या.
माझा काही गझलेचा अभ्यास नाही बुवा..... कुणी सांगितले तुम्हाला की माझा गझलेचा अभ्यास वगैरे आहे ? कोण अशा अफवा पसरवत आहे ? म्या पामर तर एक साधा वाचक आहे.
मोठे पणा वयामुळे नाही तर कामगिरीमुळे ठरतो त्या मुळे वयाबद्दल आपण परत कधी तरी बोलू.
कळावे लोभ असावा

बापूजी या रचनेचे रसग्रहण करून सांगा बरे. माझे थोडे ज्ञान वाढेल त्या मुळे. मी पण शिकेन तुमची गझल थोडी थोडी.
मला कळूद्या '*तुमच्या गझलेचे ' कांगोरेदार अर्थ, त्यातले खयाल, उपमा, अलंकार इत्यादी. मी काही ही रचना गझल नाही असे अद्याप तरी नमूद केलेले नाही. पण तुम्हालाच काही संशय आला आहे का या रचने बाबत ? *बाकी तुम्हाला वृत्त सफाईदार पणे जमते बर का ? काही ंमडळी अशी पण आहेत की ज्यांना अजून वृत्त्तातही लिहिता येत नाही. मग तुमची ही कलाकृती स्तुत्यच नाही का ?
आजकाल लोकांना दाद दिलेलीही आवडत नाही की काय ? असे असेल तर बापूजी, मी तुमच्या रचनेला या पुढे प्रतिसाद देणार नाही. एकदा या चुकी बद्दल माफी करा हुजूर या गरिबाला.

बापूजी  वरचे काही विचारात घेवू नका, गंभीर गझल- विनोद

असे करू नये.
बापूजी? असे करू नये. आपली रचना गझलच आहे असा अट्टाहास धरणे म्हणजे शत्रूघन ( घ ला न लावला होता पण तो नीट दिसत नव्हता. म्हणुन घन केले. ) सिन्हाने स्वतःला अमिताभ समजण्यासारखे आहे की नाही?
तुम्हीच सांगा बरे ही गझल कशी काय?
यात कुठे शेर वाचून नशा येतोय? यात कुठे वाह म्हणावेसे वाटत आहे? यात कुठे उपमा, खयाल, विरोधाभास, गुंगवणारे विचार किंवा मांडणी आहे? यात कुठे गझलियत आहे?
सांगा सांगा. कळुदेत सगळ्यांना.
जाता जाता हे ही सांगतो, मी ६४ बिट्स नाही, नाही तर तो एक गैरसमज व्हायचा, जसा गझल/कविता या विषयाबाबतीत झाला तसा!
श्री विनोद सावळीकर यांनी एक चांगला सल्ला दिलेला दिसतो. वरील काहीही विचारात घेऊ नका. कारण घेतले तर उगाचच गझल कशी असते हे कळेल अन मग गझल करत बसावी लागेल.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?

लेकरांना कोण नेई रोज मंदिराकडे

ही ओळ......आणि ६४ बिट्स यांचा हा प्रतिसाद!
("बाकी तुम्हाला वृत्त सफाईदार पणे जमते बर का ?")
त्याआधी कवींचे हे विधान!
("वरील गझलेतील दोष दाखविल्यास .....")
काहीतरी विसंगती आहे. 'दि' या अक्षराने काहीतरी घोळ होत नाहीये का?
खरच...
भेटले इतिहास मी अभ्यासताना गझलचा
वृत्त बोले फार बेईमान होती माणसे

 
 
 

छान्...शेर आवडले
आता ही गझल का  कविता  याची  चर्चा करीत नाही
तुम्ही  ती  पाहाल  तशी  दिसेल..

आणभाका घेवुनीया पाळणारे कोण हो
टाळ्वाली पांडुरंगी  ध्यान होती माणसे
पावसाची सावकारी फार वेळा पाहिली
पीकपाणी जाळ्णारी रान होती माणसे
आठवांनी मंद झाला श्वास माझा केवढा
सोंगटीचे शेवटाचे दान होती माणसे
लेकरांना कोण नेई रोज मंदिराकडे
देउळाला पायरीचा मान होती माणसे -  बापू दासरी 

आजोबांचे बिट्स वाढ्लेलेच असतात