र॑ग अपुले मिसळले नाही.....

र॑ग अपुले मिसळले नाही
जीवना रे हे बरे नाही


एक पुस्तक मी कवीतेचे
जे कधी तू वाचले नाही


सा॑गतो आहे कुणी वेडा
प्रेम केले पाहिजे नाही


वाग दुनियेशी जपूनी तू
लोक माझ्यासारखे नाही


शेवटी माणूस आहे मी
रक्त माझे पा॑ढरे नाही.......


                       -वैभव देशमुख


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

विचार चांगले आहेत. शुभेच्छा!

वाग दुनियेशी जपूनी तू
लोक माझ्यासारखे नाही


शेवटी माणूस आहे मी
रक्त माझे पा॑ढरे नाही.......

व्वा ! सुंदर शेर आहेत ...