लटकून जन्म गेला

स्थैर्यास शोधताना भटकून जन्म गेला
येताच वेळ मजला झटकून जन्म गेला


घाले गळ्यात ती त्या हारापरीच मी ही
आधी विलास, नंतर, लटकून जन्म गेला


ठेवून लक्ष होतो त्या भामट्यावरी मी
संमोहनी निघाला, सटकून जन्म गेला


मी एकटाच नाही, तक्रार ज्यास होती
माझा कितीजणांना खटकून जन्म गेला


मी लांबवीत गेलो श्वासास एकएका
पण ऐकले तसा तो हटकून जन्म गेला


 


 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

भूषण,
ही गझल चांगली आहे पण मी गप्प आहे.

स्थैर्यास शोधताना भटकून जन्म गेला  -  सुंदर
मी एकटाच नाही, तक्रार ज्यास होती
माझा कितीजणांना खटकून जन्म गेला  - छान.
मी लांबवीत गेलो श्वासास एकएका - व्वा.
मी पाहिली कशी नाही? उशिरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.
कलोअ चूभूद्याघ्या