रद्दी
न्हाऊनि येता अशी,ती केस झटके रेशमी.
बदलती वारे अचानक "मतलबी" बेमौसमी..
गोड होती फार म्हणुनि काल कौटाळिलि जीला.
फेकली रद्दीमध्ये मी कालची ती बातमी..
चालुनी गेलो कुठे मी..लागला चकवा असा.
पावलांचा हाय माझ्या..काढतो रे माग मी..
वेदनांची रांग मोठी पाहिली मी अंगणी
पाळणारा कोण ऐसा भेटतो का नेहमी?
मी चितेवरि पेटताना,दु:ख रडले फार माझे.
हासले देताच त्याला पुनः भेटण्याची हमी..
------- योगेश जोशी.
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
गुरु, 13/11/2008 - 11:21
Permalink
मतला
मतला वाचून हे आठवले:
कभी मयखानेतक जाते है हम और कम भी पीते है
घटा जुल्फोंकी छाजाये तो बेमौसम भी पीते है
माफ करा: माझ्यामते ही गझल सदोष आहे.
योगेश जोशी
गुरु, 13/11/2008 - 13:14
Permalink
भुषणजी, ही
भुषणजी,
ही गझल मी भीतभीतच पोस्ट केली होती.
दोष दाखविल्यास त्याप्रमाणे नक्कीच सुधारणा करता येईल.
-क.लो.अ.
योगेश
अजय अनंत जोशी
शुक्र, 14/11/2008 - 12:03
Permalink
सदोष, पण चांगली
भूषणशी सहमत.
तरीही मी याला चांगला प्रयत्न म्हणीन. कारण विधाने सदोष असली तरी चांगली आहेत.
कलोअ चूभूद्याघ्या
गंभीर समीक्षक
शुक्र, 14/11/2008 - 15:47
Permalink
न्हाऊनि
न्हाऊनि येता अशी,ती केस झटके रेशमी.
बदलती वारे अचानक "मतलबी" बेमौसमी..
चांगला शेर आहे. या शेरामधे 'अशी' हा शब्द 'असे' असा असायला हवा होता. ज्याने केस 'असे' झटकते असा अर्थ निघाला असता. 'अशी' घेतल्यामुळे ती न्हाऊन 'अशी' येते असे वाटते. त्यामुळे 'ती' न्हाऊन येण्याची वाट बघत कवी तिथेच बसत असावा असे वाटते. पश्चिम बंगाल मधील स्त्रिया रोज नाहतात. ( कदाचित नवरे घरकाम करत असावेत ). त्यामुळे कवी बंगाली असल्यास काहीच प्रॉब्लेम नाही. पण आमच्याकडच्या बायका साधारण आठवड्यातून एकदा नाहतात. ( असा एक आमचा अंदाज, बाकी त्या क्षेत्रातील अभ्यास राहिलाच ! ) त्यामुळे आमच्या भागातील कवी असल्यास त्याला आठवडाभर एकाच ठिकाणी बसून रहावे लागेल, उपोषणात बसतात तसे! इथे कवी तिच्या येण्याची वाट बघतोय हे चालते, पण वार्यांनी दिशा बदलली तर ते मात्र 'मतलबी' ठरतात. त्यात परत हल्ली काय काय ते बॉब कट, बॉय कट, शोल्डर कट, पूर्ण कट असे विविध प्रकार निघाले आहेत. त्यामुळे कवीची प्रेयसी भलतीच परंपरावादी असल्याचे पाहून आम्हा जुनाट खोडांना समाधान मिळाले.
गोड होती फार म्हणुनि काल कौटाळिलि जीला.
फेकली रद्दीमध्ये मी कालची ती बातमी..
ती कालची बातमी कसली होती ते समजले की या शेरावर भाष्य करणे अगदीच सोपे होऊन जाईल. पण जरा विचार केल्यास अंदाज बांधता येईल की अशी कोणची बातमी असावी जी काल गोड वाटावी अन आज फेकून द्यावीशी वाटावी? काल कवी बोर्डात आल्याची बातमी असू शकेल, जर पुढच्याच वर्षी महाविद्यालयात बिचारा अत्यंत अपरिहार्य कारणांनी अनुत्तीर्ण झाला असेल तर.
चालुनी गेलो कुठे मी..लागला चकवा असा.
पावलांचा हाय माझ्या..काढतो रे माग मी..
हे पटते. गझल करता करता कवी कुठे गेला हेच कळत नाही. त्याच्यासह गझलपण आपली चालत होती. तिला चॉईस कुठेय?
वेदनांची रांग मोठी पाहिली मी अंगणी
पाळणारा कोण ऐसा भेटतो का नेहमी?
हा एक चांगला शेर आहे.
मी चितेवरि पेटताना,दु:ख रडले फार माझे.
हासले देताच त्याला पुनः भेटण्याची हमी..
वृत्तबद्ध गझल करण्याला कवीचा बहुधा काहीतरी मूलभूत तात्विक विरोध असावा. गझल हा काव्यप्रकार निर्माण करणारी माणसेच, ऐकणारी अन नावाजणारी माणसेच व त्याच्या बांधणीला मुळापासून धक्के देऊन प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटणारीही माणसेच अशी काहीतरी विद्रोही भावना या शेरामधून पुढे येते. एका विशिष्ट प्रकारच्या कवितेलाच गझल का म्हणावे असा एक प्रचंड वादोत्पादक ज्वलंत सवाल या शेरात केला गेला आहे. इथे मला नवा-गझलकारांच्या पिढीची एक ठिणगी पेटलेली दिसत असून तिच्या क्रांतीआगेचे लोण लवकरच समाजात पसरून त्यात मूळ गझलशी एकनिष्ठ राहणार्यांचा क्रूर नि:पात होताना दिसत आहे. मूळ गझल ही स्वतःच्या कायद्यांप्रमाणे पिढ्यानपिढ्या तळागाळातील मागास कवी वर्गाचे शोषण करत होती व आता मात्र तिची ही दादागिरी खपवुन घेतली जाणार नाही असा नारा किंवा ललकार या शेरातून प्रकट होत आहे. या दैदीप्यमान महत्वाकांक्षेला माझ्या हार्दिक शुभेच्छा!
एकंदर गझल आशयाच्या दृष्टीकोनातून चांगली!
१०० पैकी ४९.
योगेश जोशी
शुक्र, 14/11/2008 - 18:10
Permalink
धन्यवाद
धन्यवाद सर्वांचेच.
@गंभीर समीक्षक.
मला असेच परखड समीक्षण हवे होते.मी गझलेच्या प्रांतात तसा नवीनच आहे त्यामुळे तोल सांभाळत चालताना बर्याचे वेळेला तोंडावर पडतो.वृत्तामध्ये लिहिताना सध्यातरी फार भंबेरी उडत आहे.
.क.लो.अ.
गंभीर समीक्षक
शुक्र, 14/11/2008 - 18:41
Permalink
अजिबात भंबेरी नाही!
कवी योगेश जोशी,
समीक्षकांना प्रतिसाद देणारे आपण पहिलेच.
हे जे समीक्षक आहेत ते गझलेची समीक्षा करत नसून मिश्कील पद्धतीने त्यातील काही ठळक कमतरता दाखवतात.
आपली अजिबात फारशी भंबेरी उडालेली नाही.
अजय जोशी यांनी नुकतीच प्रकाशित केलेली 'अहं ब्रह्मास्मि' शीर्षकाची गझल वाचून ही गझल दुरुस्त करा व संपादीत करा.
आपल्याला वृत्तबद्ध लिखाण येणारच.
समीक्षकांच्या आपल्याला शुभेच्छा!
बोलू का
मंगळ, 18/11/2008 - 10:37
Permalink
हाय..
चालुनी गेलो कुठे मी..लागला चकवा असा.
पावलांचा हाय माझ्या..काढतो रे माग मी..
पावलांचा हाय म्हणजे काय?
पावलांची हाय मजला वगैरे असे काही पाहिजे होते का?
मी चितेवरि पेटताना,दु:ख रडले फार माझे.
हासले देताच त्याला पुनः भेटण्याची हमी..
यातील विचार छान आहे.