आम्ही


हे रोजचेच गाणे
आम्ही तरी दिवाणे


प्रश्न ढकलू दुज्यावर
आम्ही दळू उखाणे


रे आव जिंकण्याचा
आम्ही जरी उताणे


यश बैसले समोरी
आम्ही लिहू बहाणे


वेडीच वाट त्यांची
 आम्हीच ते शहाणे


आरंभ भैरवीने
आम्ही  असे घराणे


आम्हांस कुरमुरेही
काजू बदाम खाणे


वाळीत गाव घाली
आम्ही मनुष्यघाणे

गझल: 

प्रतिसाद

'जोडाक्षरांचा वृत्तावर होणारा प्रभाव' ही समस्या आहे माझी. मार्गदर्शन हवे आहे.

बेदाणे काय बसते असे वाटत नाही. आरंभ भैरवीने हा अफाट शेर आहे. अत्यंत कमी शब्दात विरोधाभास दाखवणे अन तेही इतक्या छान पद्धतीने! व्वाह!
मात्र बाकीचे शेर 'भैरवी' इतके उजवे वाटले नाहीत. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. मागे एकदा मला असा प्रतिसाद मिळाला होता की:
"तुम्हाला ( म्हणजे मला - प्रतिसाद देणारा मला म्हणत होता ) एखादी गझल न आवडणे याचा अर्थ ती गझल चांगली आहे असे मानायला हरकत नाही. तुम्ही स्वतःच म्हणता की तुम्हाला तुमच्याच अभिरुचीबद्दल शंका आहे, तेव्हा तुम्ही असे म्हणणे की गझल आवडली नाही याला तसा काही अर्थच नाही."
माझ्यामते 'मनुष्यघाणे' हे निश्चीतच वृत्तात आहे. प्रश्न ढकलू दुजावर हे माझ्यामते मात्रांमधे बसुनही म्हणायला थोडा त्रास व्हावा.
आरंभ भैरवीने - उत्तम!
 

प्रश्न ढकलू दुज्यावर >> निरोप पाठवला आहे.

आम्हां नको  बेदाणे >> श्री. भूषण ह्यांच्याशी सहमत.

बहिष्कार गाव घाली >> इथे 'हि' दीर्घच येणार. त्यामुळे वृत्त भंगले.

बाकी, गझलच्या बाबतही श्री. भूषण ह्यांच्याशी बर्‍याच अंशी सहमत.

~ नचिकेत.

बेदाणे बसत नाहीत. सध्यातरी त्यात 'फुटाणे' घातलेत. तुमच्याकडे दुसरा पर्याय असल्यास सुचवा.
तुम्ही मत द्या. डावं की उजवं नंतर बघू आपण.

निरोप मिळाला.
'हि' च्या बाबतीत सुट घ्यावी लागेल वाटते. दुसरा पर्याय शोधतोय. आपण सुचवल्यास जास्त आनंद.
आपल्या सहमतीबद्द्ल आभार. शक्य झाल्यास या गझलवर  नव्याने विचार करेन.
 

आपला हा शेर!
चव खास कुरमुर्‍यांची
आम्हां नको  फुटाणे
माझ्यामते 'वृत्तात' बसावे या इच्छेने आपण हा बदल केला आहेत परंतू याच्यात 'कुरमुर्‍यांपेक्षा' 'फुटाणे' श्रेष्ठ असतात असे वाचकाला गृहीत धरायला आपण भाग पाडत आहात. म्हणजे असे, की कुरमुर्‍यांच्या तुलनेत बेदाणे हा शब्द वापरून जो विरोधाभास निर्माण होतो तो फुटाण्यांनीही होतो असे वाचकाने समजावे असे आपल्याला वाटते असे दिसते. माझ्यामते तो तसा होत नाही. फुटाणे हा पदार्थही तसा सामान्यच आहे.
मेवा नकोच खाणे
मेवा कशास खाणे?
आम्हास कुरमुरेही - काजू बदाम खाणे
वगैरे घेतले तर उद्देश सफल होतो असे वाटते.
माफ करा. एखाद्याला बदल सुचवणे ही माझी पात्रताही नाही व तशी इच्छाही नाही. आपण देत असलेल्या मोठेपणामुळे तो मोह आवरता येत नाहीये इतकेच!
धन्यवाद!

वाळीत टाकून बघा.

चर्चेचा सुकामेवाही उत्तम.
बाकी सर्वांशीच सहमत.
कलोअ चूभूद्याघ्या