नाही

भेटलो शब्दात नाही
आणि प्रत्यक्षात नाही
जमविले कित्येक मोती
ओवले धाग्यात नाही
पेरतो वाटेत काटे
फूल मम भाग्यात नाही
साजरे केलेत सण मी
'घर' जरी वाड्यात नाही
देव हा ही पावतो ना,
रांग का दारात नाही ?
फास घे तू धोतराने
लाज या नेत्यात नाही
आसवे डोळ्यांत त्यांच्या
ओल ती गाभ्यात नाही
माकडे ती तीन... बापू
आज या देशात नाही
 
गझल: 

प्रतिसाद

मायबोलीच्या कार्यशाळेसाठी लिहीलेली गझल. मुळ मतला वेगळा होता व त्यातल्या अर्थावर आधारित हा मतला कार्यशाळेने सुचवला.  त्यामुळे त्याचे क्रेडीट मी घेऊ शकत नाही. बाकी प्रपंच माझाच आहे व त्यावर कार्यशा़ळेने संस्कार केलेत. कार्यशाळेचे उपकार अधोरेखित करण्यासाठी ही गझल येथे देत आहे. जाणकार त्याचा अमूल्य वेळ देतील ही अपेक्षा.

गझलेची कार्यशाळा घेतली जाते ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गझल या काव्यप्रकारामधून ( ऐकणे वा स्वतः रचू शकणे ) एक अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. तो काव्यप्रकार सशक्तपणे सर्वत्र पसरावा यासाठी कार्यशाळा अत्यावश्यक आहे. मलाही अशा कार्यशाळेमधे सहभागी व्हायची इच्छा आहे. नाहीतर कोण कुणावर एवढा वेळ घालवणार? या साईटवर असे काही आदरास पात्र ठरलेले कवी आहेत ( जसे प्रदीप कुलकर्णी वगैरे ) ज्यांना साक्षात भटांचाच सहवास लाभला होता. आता कुणीतरी आमच्यासारख्यांसाठी कार्यशाळा घ्यावी असे मलाही वाटते.
'आणि प्रत्यक्षात नाही' व 'घर जरी वाड्यात नाही' हे दोन शेर मला अत्यंत आवडले. आपण कृतज्ञपणे त्या कार्यशाळेची आठवण म्हणुन ही गझल इथे दिलीत हे आपल्या सद्प्रवृत्तीचे निदर्शक आहे.
ओती व काटे या शेरांमधील मुद्दे अनेकवेळा सांगुन झालेले आहेत. त्यात नावीन्य आणणे हे तुमच्याआमच्यासारख्या कवींचे काम आहे असे मला वाटते.
धोतर व बापू हे शेर गझलेच्या एकंदर मूडला डेव्हिएट करतात असे वाटते.
 
गझलेची कार्यशाळा घेतली जाते ही अत्यंत आनंदाची बाब आहे. गझल या काव्यप्रकारामधून ( ऐकणे वा स्वतः रचू शकणे ) एक अवर्णनीय आनंद प्राप्त होतो. तो काव्यप्रकार सशक्तपणे सर्वत्र पसरावा यासाठी कार्यशाळा अत्यावश्यक आहे. मलाही अशा कार्यशाळेमधे सहभागी व्हायची इच्छा आहे. नाहीतर कोण कुणावर एवढा वेळ घालवणार? या साईटवर असे काही आदरास पात्र ठरलेले कवी आहेत ( जसे प्रदीप कुलकर्णी वगैरे ) ज्यांना साक्षात भटांचाच सहवास लाभला होता. आता कुणीतरी आमच्यासारख्यांसाठी कार्यशाळा घ्यावी असे मलाही वाटते.
'आणि प्रत्यक्षात नाही' व 'घर जरी वाड्यात नाही' हे दोन शेर मला अत्यंत आवडले. आपण कृतज्ञपणे त्या कार्यशाळेची आठवण म्हणुन ही गझल इथे दिलीत हे आपल्या सद्प्रवृत्तीचे निदर्शक आहे.
मोती व काटे या शेरांमधील मुद्दे अनेकवेळा सांगुन झालेले आहेत. त्यात नावीन्य आणणे हे तुमच्याआमच्यासारख्या कवींचे काम आहे असे मला वाटते.
धोतर व बापू हे शेर गझलेच्या एकंदर मूडला डेव्हिएट करतात असे वाटते.
 
कार्यशाळा फक्त तंत्राची असू शकेल. असली तर फार मोठी नसावी. २०-२५ जणांचीच असावी. त्याने एकमेकांचा सहवास लाभतो.
जे मिळे सहवास - भेटी
कार्यशाळेच्यात नाही
बाकी गझल एकंदरीत ठीक.
कलोअ चूभूद्याघ्या

देव, आसवे, माकडे हे शेर  आवडले.
"फूल मम भाग्यात नाही" यात 'ग' वर आघात असल्याने ठेक्यात उच्चारतांना  त्रास होतो. ('धाग्यात'आणि 'भाग्यात' यातला फरक लगेच ल़़क्षात येतो.)
तसेच-

फास घे तू धोतराने
लाज या नेत्यात नाही.. हा शेर कळला नाही.