भणंग १
जगावर राज्य करतो मी प्रजा सांभाळतो आहे
स्वतःला भेटण्याचे मात्र थोडे टाळतो आहे
किती सामर्थ्य माझे माहिती नाही मला सुद्धा
सहज एका अशक्ताला कधीचा पाळतो आहे
जिथे पाऊल टाकावे तिरस्कारात पडते ते
कधी रस्ता, कधी मी पावले न्याहाळतो आहे
इथे ही जिंदगी बोलायला सुद्धा महागे अन
क्रियेविण लांबवर मृत्यू उगा वाचाळतो आहे
नफा माझाच आहे सांगुनी प्रत्येकजण इथला
मला हाताळतो आहे जणू कुरवाळतो आहे
पुढेही मीच माझ्या, मीच मागे, काळजी कसली?
शहाणा होत वारंवार मी ठेचाळतो आहे
सुखांनो फक्त प्रौढांना प्रवेशाची मिळे संधी
तुम्ही येऊ नका मी आत अश्रू गाळतो आहे
हजामांचीच स्वागतकक्षवाली मासिके आम्ही
कुणीही जात येता, येत जाता चाळतो आहे
"कसा माणूस होता" बोलला खांदेकरी माझा
"न डोळा वाळतो याचा, कधीचा जाळतो आहे"
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 10/11/2008 - 11:59
Permalink
हेही ऍड करावेत अशी विनंती.
कृपया हेही ऍड करावेत.
मुखवटे आणि वस्त्रे वेगळी, हृदये पुराणी पण
अशा व्यक्तिस भेटुन जीव हा किंचाळतो आहे
ही गझल मात्र ठीक वाटली.
अजय अनंत जोशी
सोम, 10/11/2008 - 22:51
Permalink
हे..
हजामांचीच स्वागतकक्षवाली मासिके आम्ही
कुणीही जात येता, येत जाता चाळतो आहे
कलोअ चूभूद्याघ्या
कौतुक शिरोडकर
मंगळ, 11/11/2008 - 11:47
Permalink
चाळतो
हजामांचीच स्वागतकक्षवाली मासिके आम्ही
कुणीही जात येता, येत जाता चाळतो आहे
वेगळाच.