रोजचेच
गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच
लोचनी तिच्या सदैव
पाहतो नवेच पेच
वागतो किती जपून
लागते मधेच ठेच
नेमकी फुले गहाळ
पाकळ्या हळूच वेच
भार फार नियमनात
बोलतात आकडेच
काय लढवशी गडास
जर फितूर आतलेच
चेहरे तसे नवीन
चर्म, कर्म, धर्म तेच
डाव खेळती जुनाच
यास पाड, त्यास खेच
चार यार जोडलेत
भार वाहतील तेच
चल चहाच सांग दोन
परवडे खिशास हेच
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 10/11/2008 - 11:52
Permalink
बाआआअस्स्स्स!
मनापासून कौतूक.
अत्युत्तम गझल. ( ओळींची मांडणी - थोडी स्पेस द्यावीत ).
एक एक शेर उत्तम आहे. एखाद्या शेराचा उल्लेख करणे अनुचित ठरेल.
फारच सुंदर!
मित्र, चहा, पेच, ठेच, फितुर हे अतिशय चांगले शेर आहेत.
धन्यवाद!
ज्ञानेश.
सोम, 10/11/2008 - 12:17
Permalink
खलास.
दाद द्यायला भाग पाडणारी गझल.
वागतो किती जपून
लागते मधेच ठेच.. सुंदर
काय लढवशी गडास
जर फितूर आतलेच... वाह! वजनदार शेर.
डाव खेळती जुनाच
यास पाड, त्यास खेच... क्या बात है!
चार यार जोडलेत
भार वाहतील तेच.. खलास! हासिले गझल!!
चल चहाच सांग दोन
परवडे खिशास हेच.. चहा घेतला पाहिजे खरच तुमच्यासोबत.
एवढ्यात असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, पण माझा असा तर्क आहे की लहान वृत तुम्हाला अधिक मानवते. चूभूद्याघ्या.
पुढील गझलेसाठी शुभेच्छा.
अजय अनंत जोशी
सोम, 10/11/2008 - 23:09
Permalink
छान
सर्व छान. शिरोडकरांचे कौतुक.
कलोअ चूभूद्याघ्या
कौतुक शिरोडकर
मंगळ, 11/11/2008 - 11:43
Permalink
आभार
चला. जमलं काहीतरी. ज्ञानेशराव म्हणतात तेच खरे.
घेतली न मी उगाच
अता बोलतो खरेच
ज्ञानेश.
मंगळ, 11/11/2008 - 19:05
Permalink
अंहं..
"घेतली न मी उगाच,
बोलतो अता खरेच..." असे करावे.
अन्यथा खरच 'घेतली' असे वाटेल. :)
मानस६
मंगळ, 11/11/2008 - 21:19
Permalink
उत्तम
छोट्या बहरा मधील एक चांगली गझल्..वा
-मानस६
अनंत ढवळे
बुध, 19/11/2008 - 09:50
Permalink
चांगले
चेहरे तसे नवीन
चर्म, कर्म, धर्म तेच
डाव खेळती जुनाच
यास पाड, त्यास खेच
चल चहाच सांग दोन
परवडे खिशास हेच
चांगले शेर
बोलू का
शुक्र, 21/11/2008 - 22:25
Permalink
कौतूक
लहान वृत्तातून चांगली हाताळणी केल्याबद्दल प्रथम आपले कौतूक.
पण माझे मत असे आहे की, लहान वृत्तातील गझल फारसा प्रभाव पाडू शकत नाही. कारण, शब्दांची मर्यादा. विषयाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन आवडला. पण मोठ्या वृत्तातून लिहिण्याचा प्रयत्न केल्यास खूप चांगले लिहू शकाल. अर्थात हे माझे मत.
तसा मी फारसा बोलत नाही.