सणासुदीला नटणारा

क्षणाक्षणाने घटणारा, संधी मिळता कटणारा
जीवन म्हणजे बघत रहा, काळ रंग पालटणारा

माणुसकी सुद्धा येथे, आधारित सोयीवरती
हात जोड वाघाला अन, ठेच किडा सरपटणारा

बारा महिने डोळ्यांना पाझर फुटतो मोत्यांचा
तुझ्यासारखा नाही मी, सणासुदीला नटणारा

'अता सोड की' म्हणताना, घट्ट मला ती बिलगे का?
तिचाच मुद्दा बहुधा तो, तिला नसावा पटणारा

रोज सकाळी आशेची न्याहारी दे मनास मी
कोण इथे दुसरा आहे त्याच्यासाठी झटणारा?

हवा नि माझे युद्ध तसे युगे युगे चालत आले
माझा दर निश्वास असे श्वासावर आपटणारा

देह जाहला जून अता, हात पाय लटपटणारा
पक्षी ह्रुदयाचा अजुनी नको तिथे भरकटणारा

साप सांगतो सापाला, "मनुष्यवस्तीस सोडुया"
"जहरी जात नि फसव्यांचा स्वभाव भुइ धोपटणारा"

गझल: 

प्रतिसाद

बरेच दिवस झाले ही गझल फक्त मलाच दिसतीय. हा हा हा हा!

'अता सोड की' म्हणताना, घट्ट मला ती बिलगे का?
तिचाच मुद्दा बहुधा तो, तिला नसावा पटणारा
देह जाहला जून अता, हात पाय लटपटणारा
पक्षी ह्रुदयाचा अजुनी नको तिथे भरकटणारा

साप सांगतो सापाला, "मनुष्यवस्तीस सोडुया"
"जहरी जात नि फसव्यांचा स्वभाव भुइ धोपटणारा"

आणखी एक ... जमलंय क बघा...
जीवनात सहजा सहजी काय कुणाला मिळते रे..
अर्थहीन घोटाळे अन् चेक कधी ना वटणारा
कलोअ चूभूद्याघ्या

बारा महिने डोळ्यांना पाझर फुटतो मोत्यांचा
तुझ्यासारखा नाही मी, सणासुदीला नटणारा

मस्तच.

हे  शेर  आवडले-
 
"माणुसकी सुद्धा येथे, आधारित सोयीवरती
हात जोड वाघाला अन, ठेच किडा सरपटणारा"

'अता सोड की' म्हणताना, घट्ट मला ती बिलगे का?
तिचाच मुद्दा बहुधा तो, तिला नसावा पटणारा...
बाकी  तुमच्या  जवळपास  प्रत्येक गझलेत मनाचे  लाड पुरवणारा एक तरी शेर  असतोच, जसा  इथे न्याहरीचा  आहे.
उदा.- आमचे मन आमचा 'सम्राट' आहे...
जोशींचा न वटणारा  चेकही  मस्त.