खून केले...
खून केले...
या तुझ्या लाघवी हासण्याने खून केले...
लोचनी साठल्या अमृताने खून केले...
का उगा दावला, चेहरा तू दर्पणाला?
तुज पुन्हा पाहण्या, आरशाने खून केले...
रंग तू माळला, पौर्णिमेच्या मैफलीला...
आर्जवी छेडल्या, मारव्याने खून केले...
गंध आता सखे, का फुलांना आकळावा?
धुंद श्वासातल्या, मोगर्याने खून केले...
नेत्रबाणी तुझ्या अर्जुनाने बद्ध व्हावे...
वक्र भुवयातल्या विक्रमाने खून केले...
मी तुला रेखले आर्जवांच्या आर्जवांनी...
तूच माझी गझल गायल्याने खून केले...
- निरज कुलकर्णी.
या तुझ्या लाघवी हासण्याने खून केले...
लोचनी साठल्या अमृताने खून केले...
का उगा दावला, चेहरा तू दर्पणाला?
तुज पुन्हा पाहण्या, आरशाने खून केले...
रंग तू माळला, पौर्णिमेच्या मैफलीला...
आर्जवी छेडल्या, मारव्याने खून केले...
गंध आता सखे, का फुलांना आकळावा?
धुंद श्वासातल्या, मोगर्याने खून केले...
नेत्रबाणी तुझ्या अर्जुनाने बद्ध व्हावे...
वक्र भुवयातल्या विक्रमाने खून केले...
मी तुला रेखले आर्जवांच्या आर्जवांनी...
तूच माझी गझल गायल्याने खून केले...
- निरज कुलकर्णी.
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 25/10/2008 - 14:35
Permalink
तूच माझी गझल गायल्याने..
अप्रतिम!
आरश्याचा व वक्र भुवयांचा असे दोन शेर फार आवडले.
तूच माझी गझल गायल्याने खून केले.....सॉलीड.
कौस्तुभ कुलकर्णी (not verified)
रवि, 26/10/2008 - 15:26
Permalink
सुंदर !!!
सुंदर !!! अप्रतीम !!
तूच माझी गझल गायल्याने खून केले...
एक नंबर !!