गप्प ३.

हा जन्म कासवासारखा  गेला हळूहळू
माणूस जन्मल्यापासुनी   मेला हळूहळू


आता वयामुळे गाठणे    ना शक्य रे मना
वेगामधे गुरू चालला    चेला हळूहळू


ना भाव तीस जखमांमुळे   विस्तीर्णशी जरी
जागा मनातली मुफ्त ही   रेला हळूहळू


बेचैन होत येई जरी   काही न बोलते
बोटात गुंफते सोडते   शेला हळूहळू


पाहून दु:ख-साठे इथे      व्यसनीच जाहला
माझी नशा शिकू लागला   पेला हळूहळू


द्यावी सुखे, सुखे घेउनी, व्यापार आमचा
गुंडाळला उधारीमुळे,     ठेला हळूहळू


ती विभ्रमांस वर्षावते   दुर्मीळ गोष्ट ही
सांडू नका इथे अन तिथे,  झेला हळूहळू


टाळून जात आधी मला, "हा ऐकवी उगी"
निर्जीव देह का मिरवुनी    नेला हळूहळू?


दुनियेत शायरी कोळसे   गेलो उगाळुनी
माझा चितेमधे कोळसा    केला हळूहळू



 

गझल: 

प्रतिसाद

शेला या शेरामधे शेल्याचा संबंध काय? ऑ? शेलाच का सोडते अन गुंफते? वेणी का नाही? बॉबकट होता का? मग ओढणी गुंफायची! शेलाच का? गझलेत बसतोय म्हणुन ना? ऑऑऑ?

मतला, उधारी, विभ्रम  हे  शेर  आवडले.  'रेला' मधे  थोडी  ओढाताण  जाणवते.
शेवटचा शेर नको  होता  असे  वाटले.

बेचैन होत येई जरी   काही न बोलते
बोटात गुंफते सोडते   शेला हळूहळू

पाहून दु:ख-साठे इथे      व्यसनीच जाहला
माझी नशा शिकू लागला   पेला हळूहळू

द्यावी सुखे, सुखे घेउनी, व्यापार आमचा
गुंडाळला उधारीमुळे,     ठेला हळूहळू.. हे शेर भावलेत
-मानस६