शब्दवीर...
शब्दवीर... (गझल)
संवाद साधण्याला, थोडा उशीर झाला...
अन् धुंद श्वास माझा, आता फकीर झाला...
वाळूत रेखिले मी, सौंदर्य 'अमृता'चे...
सामावण्यास तिजला, सागर अधीर झाला...
( ज्या मुलीसाठी मी काव्य रचतो तिचे नाव 'अमृता' आहे. )
स्वर्गीय देवतांनी, अमुच्यात फूट केली...
हा कालिदास 'काफर', मुस्लीम 'मीर' झाला!
पाठीत घाव करणे, मोठी 'कला'च आहे!
तो कालचा शिपाई, झटकन 'वजीर' झाला!!!
गझलेतल्या नशेने, जो चिंबलाच नाही...
कोणी कुठे असाही, का 'शब्दवीर' झाला???
- निरज कुलकर्णी.
गझल:
प्रतिसाद
तिलकधारीकाका
शुक्र, 24/10/2008 - 20:06
Permalink
चांगली
'अमृता, काफर व वजीर 'हे शेर चांगले आहेत.
गझलेचा शेर पण आवडला. 'अमृता' या शेरात स्पष्टीकरण देणे मात्र आवश्यक आहे अथवा संदर्भ लक्षात येणार नाही. मतल्याचा संदर्भ समजावून सांगीतल्यास बरे होईल.
आपल्या दोघांनाही तिलकधारीच्या मनःपुर्वक शुभेच्छा!
गंभीर समीक्षक
शनि, 25/10/2008 - 13:17
Permalink
छान!
संवाद साधण्याला, थोडा उशीर झाला...
अन् धुंद श्वास माझा, आता फकीर झाला...
फकीर म्हणजे जे 'रस्त्यावर काहीतरी धूर निघणारे हातात घेऊन फिरतात व आशीर्वाद देऊन पैसे मागतात' ते. फकीर या शब्दाचा खरा अर्थ आहे ' जिवंत प्रेत'. म्हणजे माणसाने स्वतःच्या गरजा इतक्या कमी करायच्या की जणू एखाद्या प्रेताप्रमाणे वागायचे. ना कसली इच्छा, ना अन्न मिळालेच पाहिजे असा आग्रह! श्वास तसे होण्याचे कारण म्हणजे संवाद साधण्याला जो उशीर झाला त्यामुळे आधी धुंद असलेला श्वास आता फकीर झाला. प्रेमात टायमींगला भयंकर महत्व आहे. 'आपल्या प्रियेला असे कसे विचारायचे की बाईगं माझी होशील का' असे जेव्हा वाटते तीच वेळ विचारण्याची असते याचा साक्षात्कार या शेरामधून होत आहे याची या क्षेत्रातील नवोदीतांनी नोंद घ्यावी.
वाळूत रेखिले मी, सौंदर्य 'अमृता'चे...
सामावण्यास तिजला, सागर अधीर झाला...
( ज्या मुलीसाठी मी काव्य रचतो तिचे नाव 'अमृता' आहे. )
इथे कदाचित पश्चात्तापाची भावना असावी अशी शंका घेण्यास पुरेसा वाव कवीने ठेवला आहे. म्हणजे हे 'नक्की सौंदर्याचे वर्णन आहे' का 'कुठुन बुद्धी झाली अन तिचे चित्र वाळूत काढले ज्याने आता समुद्र अधीर झाला आहे' असे वाटत आहे हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. आणखीन एक वेगळाच मुद्दा असा की 'असे चित्र वाळूत भर किनारी तेही समुद्रासमोर काढायला तिची परवानगी होती की नव्हती' ते समजत नाही. पण ज्याअर्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर हे जाहीर केले जात आहे त्याअर्थी परवानगी असावी. आता मुद्दा असा येतो की अशा काही परवानग्या असल्याच तर कवी समुद्रावर बसून एकटाच तिचे चित्र का रेखत होता?
स्वर्गीय देवतांनी, अमुच्यात फूट केली...
हा कालिदास 'काफर', मुस्लीम 'मीर' झाला!
या शेरात शब्दांच्या क्रमाला महत्व द्यायला हवे होते असे जाणवते. म्हणजे जसे ' हा कालिदास काफर' यातुन समजते की कालिदास काफर झाला तसे ' मुस्लीम मीर झाला' मधुन जाणवते की जो कुणी मुस्लीम होता तो मीर झाला. मुळात हा शेर रचण्याच्या आवश्यकतेची समीक्षा करणे आवश्यक आहे. का रचला असावा हा शेर? कवीला इतकी भावनिक गरज का वाटली असावी की सारे कवी जातीधर्मात विभागले गेल्यामुळे फार घोळ झाला आहे. आपल्याला मीरच्या गझलांचे रसग्रहण करण्याचा पूर्ण अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे. मग प्रॉब्लेम काय असावा?खालील कारणे असावीत.
१. शेवटी कवी हा कवीच असतो, त्याला जातधर्म नसतो हे सांगायचे असावे.
२. स्वर्गात राहणार्या देवतांना फूट पाडायची असते हे सांगायचे असावे.
३. वजीर, अधीर याबरोबर मीर बसू शकतंय असे वाटले असावे.
पाठीत घाव करणे, मोठी 'कला'च आहे!
तो कालचा शिपाई, झटकन 'वजीर' झाला!!!
चांगला शेर. बर्याच क्षेत्रात लागू होणारा.
गझलेतल्या नशेने, जो चिंबलाच नाही...
कोणी कुठे असाही, का 'शब्दवीर' झाला???
शेराची पहिली ओळ फार सुंदर आहे. तसा अर्थही सुंदर आहे.
एकंदर गझल चांगली.
११० पैकी ३७.
भूषण कटककर
शनि, 25/10/2008 - 14:32
Permalink
व्वाह!
स्वर्गीय देवतांनी आमच्यात फूट केली...व्वाह!
सुंदर गझल आहे.
कौस्तुभ कुलकर्णी (not verified)
रवि, 26/10/2008 - 15:32
Permalink
वाळूत
वाळूत रेखिले मी, सौंदर्य '***' चे...
सामावण्यास तिजला, सागर अधीर झाला...
माफ करा कुलकर्णी साहेब, पण आमच्या लग्नात आपण
हेच नाव घेणार....
सुंदर!!!!