लुत्फ से हो के कहर से... ह्याचा अर्थ?
जिगर मुरादाबादी ह्यांची गुलाम अली ह्यांनी स्वर-बद्ध केलेली आणि गायिलेली एक गझल बरेच दिवस झाले ऐकतो आहे.. अतिशय मधाळ चाल आहे..शायरी सुद्धा लाजवाब आहे.. त्यातील एका शेराचा अर्थ काही केल्या लागत नाहीय.. जाणकार कृपया मदत करतील का? ज्या शेराचा अर्थ लागत नाही तो असा-
लुत्फ़ से हो कि कहर से होगा कभी तो रू-ब-रू
उसका जहाँ पता चले शोर वहीं मचाए जा..
मला काहीसा असा अर्थ लागतो आहे.. प्रेयसी प्रियकराच्या प्रेमात असून सुद्धा ते प्रेम नाकबूल करते आहे..आणि त्याला भेटायचे मुद्दाम टाळते आहे.. पण ती कधी ना कधी विरहार्त होऊन प्रियकराला भेटणारच ...प्रेमाने अथवा रागाने.. कशीही..ह्याची प्रियकराला खात्री आहे... म्हणून तो असे म्हणत असावा.. मग शोर वही मचाये जा असे का म्हणत असावा..?
संपुर्ण गझल एका संकेत-स्थळावरुन जशीच्या तशी येथे पेस्ट करतो आहे..
मेरा जो हाल हो सो हो बर्क़-ए-नज़र गिराए जा
मैं यों ही नालाँकश रहूँ तू यों ही मुसकुराए जा
दिल के हर-एक गोशा में आग-सी इक लगाए जा
मुतरब-ए-आतिशी नवा हाँ इसी धुन में गाए जा
जितनी भी आज पी सकूँ उज़्र न कर पिलाए जा
मस्त नज़र का वास्ता मस्त-नजर बनाए जा
लुत्फ़ से हो कि कहर से होगा कभी तो रू-ब-रू
उसका जहाँ पता चले शोर वहीं मचाए जा
इश्क को मुतमा-इन न रख हुस्न के एतमाद पे
वो तुझे आज़मा चुका तू उसे आज़माए जा
–
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 20/10/2008 - 07:52
Permalink
माझ्या मते.
प्रेयसीच्या नजरेसमोर रहावे किंवा सतत तिला शायराची आठवण यावी म्हणुन्...माफ करा, मल एवढेच आकलन झाले.
तिलकधारीकाका
सोम, 20/10/2008 - 14:44
Permalink
गप्प.
प्रिय मित्र मानस,
त्याचा अर्थ असा आहे की:
करुणा म्हणुन किंवा भयानक चिडून का होईना, 'ती जिथे आहे तिथे तू आक्रोश केलास की' ती समोर तरी येईल. मग पुढचे पुढे बघता येईल. आत्ता तर ती दिसत सुद्धा नाही त्यापेक्षा बरे.
असो. जिगर मुरादाबादी हा मीर, गालिब, मोमीन यांच्या तुलनेत कनिष्ठ दर्जाचा शायर होता. 'हजरत दाग देहलवी' च्या दर्जाचा. श्रुंगारयुक्त शेर रचण्याकडे त्याचा कल जास्त होता.पण तो प्रचंड प्रसिद्ध होता ते त्यामुळेच.
मानस६
मंगळ, 21/10/2008 - 20:14
Permalink
धन्यवाद्..पण
धन्यवाद तिलक धारी.. पण आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'गप्प' असे का आहे हे कळले नाही?
-मानस६
सुशिल (not verified)
मंगळ, 28/10/2008 - 11:34
Permalink
गालिब ?
आह को चहिये एक उम्र असर होने तक
कौन जिता है तेरे जुल्फ के सर होने तक
अर्थ?
मनस्वीआनंद
सोम, 03/11/2008 - 17:07
Permalink
लुत्फ़ से... चा अर्थ असाही असू शकतो
लुत्फ़ से हो कि कहर से होगा कभी तो रू-ब-रू
उसका जहाँ पता चले शोर वहीं मचाए जा
या ठिकाणी शायराची प्रेयसीला भेटण्याची मनीषा आणि रु-ब-रु भेटीचे वेळी होणारा मनस्वी आनंद ह्या दोहोंची गुंफ़ण सशक्तपणे व्यक्त केली गेली आहे. आता शायर प्रेयसीच्या प्रेमात इतका डुंबून गेला आहे की कुठल्या साधनाने, कसल्याही प्रकारे किंवा युक्तीने आपण प्रेयसीला भेटू याची त्याला पर्वा नाही. आता तिला प्रत्यक्ष भेटणे अत्यावश्यक झाले आहे कारण विरह असहनीय होतो आहे.
त्याची आपल्या प्रेमावर निस्सीम श्रद्धा आहे व त्याला माहीत आहे की भेट तर नक्की होणारच आहे. ती कशी होईल याला तो महत्त्व देत नाही. प्रेमाने असो वा द्वेषाने भेट होणारच आहे. विरह-आठवण इतक्या शिगेला पोहोचली आहे की ती भेट झाल्यावर त्याला इतका आनंद होणार आहे की त्याक्षणी स्थळ, वेळ, काळ यांचे त्याला भान नसेल. त्यावेळी तो आपल्या सर्व भावना-प्रेम एखाद्या अधाश्यासारख्या व्यक्त करणार आहे. म्हणूनच तो म्हणतो की ’उसका जहाँ पता चले शोर वहीं मचाए जा’. प्रेमाची परिसीमा गाठल्यावरची ही एक मानसिक अवस्था आहे.