ये जवळ
ये जवळ तुजला जरा जवळून बघतो
आज स्पर्शाने तुला बोलून बघतो
प॑ख प्रीतीचे मिळाले एकदा की,
कोण या धरतीकडे पलतून बघतो
बा॑धता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
लागता चाहूल ढळत्या यौवनाची
आरसा का एवढा त्रासून बघतो
का तुला मी घाबरावे सा॑ग मृत्यो
रे तुला मी जन्मल्यापासून बघतो........
-वैभव देशमुख
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
बुध, 15/10/2008 - 23:14
Permalink
सुरेख...!
बा॑धता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
प्रत्येकाच्याच मनातला शेर.... सुंदर...
हे तर आपल्याच मनातले कुणीतरी बोलले आहे, असे वाटणे, हे गझलेचे एक फार मोठे लक्षण. त्या अर्थाने `लक्षणी `य शेर...!!!
लागता चाहूल ढळत्या यौवनाची
आरसा का एवढा त्रासून बघतो
छान...
सुरेख
शुभेच्छा !
पुलस्ति
गुरु, 16/10/2008 - 00:46
Permalink
वा!
घर आणि मृत्यू हे शेर फार आवडले!
तिलकधारीकाका
गुरु, 16/10/2008 - 04:39
Permalink
गप्प.
गझल उत्तम आहे. मृत्यूचा शेर तर फारच भावला.
प्रदीपचा प्रतिसाद अगदी पटला. गझलियत या चर्चालेखात मी हाच मुद्दा मांडला आहे.
असे चांगल्या गझलेला तितकाच चांगला प्रतिसाद मिळणे म्हणजे खूप अभ्यास केलेल्या मुलाचा पहिला नंबर येण्यासारखे आहे.
असो. बाकी मी गप्प आहे.
अजय अनंत जोशी
गुरु, 16/10/2008 - 16:25
Permalink
हे ही छान
का तुला मी घाबरावे सा॑ग म्रुत्यो
रे तुला मी जन्मल्यापासून बघतो........
कलोअ चूभूद्याघ्या
ज्ञानेश.
गुरु, 16/10/2008 - 16:34
Permalink
वा वा वा...
पंख प्रीतीचे, घराचे चित्र, त्रासलेला आरसा.......
सगळेच शेर अप्रतिम आहेत. मृत्यू चा तर क्लासिक..
अभिनंदन.
गंभीर समीक्षक
गुरु, 16/10/2008 - 19:21
Permalink
नावीन्य व पुनरावृत्ती
कवीने पंख प्रीतीचे व चित्र घराचे या शेरांमधे आशयाचे नावीन्य दाखवले आहे. हे स्तुत्य आहे. पण आरशाने त्रासून बघणे वा जन्मल्यापासून मृत्यू थोडाफार झलक दाखवून जाणे हे गझलेत तसे नित्याने येणारे विचार आहेत.
एकाच गझलेत विविध मूड्स असले तर ते फार समर्थपणे सांभाळावे लागतात. उदाहरणार्थः
प्रीतीचे पंख मिळाल्यावर कोण पुन्हा धरतीकडे बघतोय हा तसा आनंदी, आत्मविश्वास दर्शवणारा शेर आहे. पण त्या पाठोपाठ घराचा शेर वेगळी मनस्थिती घेत येतो. अशा गझला गाताना मधल्या वाद्यांच्या पिसेसमुळे खूप आकर्षक होतात. पण एका पाठोपाठ शेर वाचले तर श्रोत्याचा किंवा वाचकाचा इन्टरेस्ट एकाच पातळीवर ठेवण्यासाठी फार ताकदवान शब्दरचना आवष्यक होते. सर्व शेरांमधे साधारणपणे समान मनस्थिती असेल तर जरा हलकी रचना असली तरी चांगली वाटते.
मुद्दा असा आहे की जो प्रियेला ये म्हणत आहे, स्पर्शाने तुझ्याशी बोलतो असे म्हणत आहे त्यालाच आरसा त्रासून बघत आहे आणि तोच प्रीतीचे पंख घेऊन आकाशात उडू इच्छित आहे व त्यालाच मृत्यू ओळखीचा वाटतो आहे. इतक्या भावनांमधून फिरून येता येता रसिक संदिग्ध मनस्थितीत जाऊ शकेल.
प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविताच असते या दृष्टीकोनातून बघायचे झाले तर सर्व शेर चांगले आहेत, पण एकत्रीकरण भाव खात नाही.
एकंदर गझल ठीक.
१०० पैकी ३२
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 21:16
Permalink
बांधता आले न मजला जे कधीही
बांधता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
शेर आवडला.
दशरथयादव
शुक्र, 06/02/2009 - 13:25
Permalink
व्वा...छान्..
आवडली
बा॑धता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
लागता चाहूल ढळत्या यौवनाची
आरसा का एवढा त्रासून बघतो
का तुला मी घाबरावे सा॑ग मृत्यो
रे तुला मी जन्मल्यापासून बघतो........
मानस६
शुक्र, 06/02/2009 - 22:22
Permalink
बा॑धता आले न मजला
बा॑धता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो... खूप दर्द आहे ह्या शेरात.
लागता चाहूल ढळत्या यौवनाची
आरसा का एवढा त्रासून बघतो... सशक्त आशय
का तुला मी घाबरावे सा॑ग मृत्यो
रे तुला मी जन्मल्यापासून बघतो...वा वा वा
मानस६
समीर चव्हाण (not verified)
रवि, 08/02/2009 - 13:17
Permalink
सुरेख
बा॑धता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
सुनेत्रा सुभाष
सोम, 09/02/2009 - 16:04
Permalink
खूपच छान शेर
का तुला मी घाबरावे सा॑ग मृत्यो
रे तुला मी जन्मल्यापासून बघतो........
ॐकार
गुरु, 19/02/2009 - 09:38
Permalink
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
बांधता आले न मजला जे कधीही
त्या घराचे चित्र रेखाटून बघतो
वावा!
वैभव देशमुख
मंगळ, 28/09/2010 - 16:51
Permalink
सगळ्यांचे मनपासून धन्यवाद....
सगळ्यांचे मनपासून धन्यवाद....
आनंदयात्री
मंगळ, 28/09/2010 - 22:27
Permalink
३ आणि ४ आवडले..
३ आणि ४ आवडले..