गझल
माळले केसात तुझिया गंध ज्यांचे
कोण जाणे काय झाले त्या फुलांचे
काल फुललो बहर झालो बहाव्याचा
आज आहे झाड वठले आसवांचे
भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?
झगमगाटाला भुलूनी धावले जे
मागचे हरवून गेले गाव त्यांचे
त्याच त्या कुरवाळुनी कंटाळलो मी
दे अता पत्ते नवे तू वेदनांचे
सोयर्यांनी माझिया जे धाडलेले
नाव मागू मी कशाला गारद्यांचे ?
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
रवि, 04/05/2008 - 20:59
Permalink
छान!
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
हा शेर फार आवडला!!!!
प्रदीप कुलकर्णी
रवि, 04/05/2008 - 21:46
Permalink
कल्पना छान....
भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
दोन्हीही कल्पना छान....
तंत्रशुद्ध गझल लिहिण्यासाठी मनापासून शुभेच्छा.
अजय अनंत जोशी
शुक्र, 10/10/2008 - 12:45
Permalink
कल्पना छान.
मूळचे ...
भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?
भे ट ल्या हा ता त गुं फू न हा त हो त्या
२ १ २ २ २ १ २ २ १ २ १ २ २ = २२
प्रे म कां ते फक् त हो ते सा व ल्यां चे
२ १ २ २ २ १ २ २ २ १ २ २ = २१
मला वाटते असे असेल..
भेटल्या हातात गुंफुन हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ? वा वा.
बाकी छानच.
कलोअ चूभूद्याघ्या
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 10/10/2008 - 14:37
Permalink
सुंदर क्ल्पना
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
पहिली ओळ परत लिहिलीत तर शेर अजून चांगला होईल, असे वाटते.
तसे दुस-या ओळीत मीटर पहायला हवे...
ज्ञानेश.
शुक्र, 10/10/2008 - 15:33
Permalink
सावल्या, गाव, पत्ते
सावल्या, गाव आणि पत्ते हे शेर जास्त आवडले.
हे मंजुघोषा असेल तर- "काठ झाले कधी ओले पापण्यांचे..." हे वाचतांना अडखळते आहे.(मला तरी)
तिलकधारीकाका
शुक्र, 10/10/2008 - 15:44
Permalink
असे करू नये.
उपरा,
असे करू नये. गझल छानच झालीय. पण वृत्तास कुठेही सोडू नये.
तिलकधारीच्या मनापासून शुभेच्छा!
मानस६
रवि, 12/10/2008 - 14:35
Permalink
भेटल्या हातात...
भेटल्या हातात गुंफून हात होत्या
प्रेम कां ते फक्त होते सावल्यांचे ?
त्याच त्या कुरवाळुनी कंटाळलो मी
दे अता पत्ते नवे तू वेदनांचे.. हे दोन्ही शेर आवडलेत
-मानस६
दशरथयादव
शनि, 10/01/2009 - 21:59
Permalink
फारच
फारच छान.....
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
दशरथयादव
शनि, 10/01/2009 - 22:00
Permalink
(No subject)
सुनेत्रा सुभाष
रवि, 11/01/2009 - 10:49
Permalink
खूप आवडली गझल
पावसामध्ये कुणा कळलेच नाही
काठ झाले कधी ओले पापण्यांचे
छानच शेर आहे.
भूषण कटककर
सोम, 12/01/2009 - 09:24
Permalink
झगमगाट
सुंदर कल्पना आहेत या गझलेमधे. झगमगटाला भुलून जाणे हा शेर फार आवडला.