मी खरे बोललो तेव्हा
मी खरे बोललो तेव्हा कुणास पटले नव्हते
मी बरे बोलल्यानेही भांडण मिटले नव्हते...
मी तुला म्हणाले होतो, "ऐकू नकोस माझे"
आता नकोस सांगू की मी हे म्हटले नव्हते...
बेसावध मी होतो, माझ्यावर हल्ला झाला
जे हृदयाला भिडले ते तीर 'निसटले' नव्हते...
जगता जगता माणुस कर्जात बुडूनच जातो!
माझे गतजन्माचेही कर्जच फिटले नव्हते...
आशेस उराशी माझ्या इतके जपले मी, पण
या नशिबाने माझे फासेच पलटले नव्हते...
तो 'अजब' पुरावा होता दोघांच्या प्रेमाचा
बोलण्यात दोघांच्या ते कधी उमटले नव्हते...
गझल:
प्रतिसाद
तिलकधारीकाका
सोम, 06/10/2008 - 16:54
Permalink
असे करू नये.
अजब?
असे करू नये.
दुसर्या शेरात यतीभंगाची शंका येतीय तसा वाव ठेवू नये. म्हणजे लायसेन्स आहे, आरसीटीसी आहे, सिग्नल तोडलेला नाहीये, तर पोलिसाला काही द्यायचेच कशाला?
उत्तम विचार! फक्त 'मी तुला म्हणाले होतो' च्या ऐवजी 'मी तुला म्हणालो होतो' झाले की सुंदर वाटेल. मला माहितीय, ती 'टायपोग्राफिकल मिसटेकच' असणार!
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?
चित्तरंजन भट
मंगळ, 07/10/2008 - 12:07
Permalink
आता नकोस सांगू की....
मी तुला म्हणाले होतो, "ऐकू नकोस माझे"
आता नकोस सांगू की मी हे म्हटले नव्हते...
वाव्वा!!! ही द्विपदी फार फार आवडली.
बाण
मंगळ, 07/10/2008 - 16:54
Permalink
बाण
तिसर्या शेरात माझा उल्लेख पाहुन बाण सुखावला.
दुसरा शेर हा अजबरीत्या उत्तम बाण!
योगेश वैद्य
शुक्र, 10/10/2008 - 08:10
Permalink
वा अजबराव!
गझल आवडली.
म्हटले,उमटले हे शेर खासच.
भूषण कटककर
शुक्र, 10/10/2008 - 13:25
Permalink
अजब
अजब,
आता नको म्हणू की हा शेर अप्रतिम आहे. भलताच मनाला भिडणारा!
ॐकार
गुरु, 16/10/2008 - 22:51
Permalink
ऐकू नकोस माझे
मी खरे बोललो तेव्हा कुणास पटले नव्हते
मी बरे बोलल्यानेही भांडण मिटले नव्हते...मी तुला म्हणाले होतो, "ऐकू नकोस माझे"
आता नकोस सांगू की मी हे म्हटले नव्हते...
मस्त शेर आहेत!
अजय अनंत जोशी
शुक्र, 17/10/2008 - 17:04
Permalink
तीर
बेसावध मी होतो, माझ्यावर हल्ला झाला
जे हृदयाला भिडले ते तीर 'निसटले' नव्हते...
कलोअ चूभूद्याघ्या