गझल - वाटते आहे
काठ डोळ्यांचे भिजावे सारखे
वाटते आहे रडावे सारखे
मी विचारावे तुला काहीतरी
आणि तू नाही म्हणावे सारखे
काय या गावात होते आपले ?
पाय का मागे वळावे सारखे
वाटते पाऊस यावा एवढा
रंग भिंतींचे उडावे सारखे
वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे सारखे.....
अनंत ढवळे
गझल:
प्रतिसाद
प्रसन्न शेंबेकर
सोम, 30/04/2007 - 11:35
Permalink
वाहुनी
वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे सारखे.....
हा शेर छनच आहे.
राजदूत
सोम, 30/04/2007 - 14:17
Permalink
गझल
मी प्रदीपच्या म्हणण्याशी सहमत आहे. कवीने किती सवलत घ्यावी ? म्हणावेस असे हवे होते.
अनंत ढवळे
सोम, 30/04/2007 - 22:17
Permalink
भाषा , कविता आपण इ इ इ इ
भाषा हे जरासे कठिण प्रकरण आहे.तूर्तास इतकेच म्हणतो (य ) !!!
अजय अनंत जोशी
शुक्र, 05/09/2008 - 23:47
Permalink
आवडले.
वाटते पाऊस यावा एवढा
रंग भिंतींचे उडावे सारखे
वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे सारखे.....
हे विशेष आवडले.