मदार... ( गझल )

मदार... ( गझल )

आरक्त लोचनांची, भाषा सुमार आहे...
माझ्याच हुंदक्यावर, माझी मदार आहे...

आश्वासने मिळाली, मजला जरी खुन्यांची;
निश्चीत आज होणे, माझी शिकार आहे...

मी हारलो तुझ्याशी, जाणून डाव सारा;
माझ्या पराजयाला, हसरी किनार आहे...

का घाव खोल केला, या लाघवी सुखाने?
पाहून 'हर्ष' आता, होतो थरार आहे!

'हे काव्य आज माझे, विकण्यास काढले मी!!'
हा कोणता निराळा, होतो प्रचार आहे???

गझला किती सुगंधी, मी रेखल्या प्रभावी;
निर्व्याज भावनेचा, चढला खुमार आहे...


- निरज कुलकर्णी.

वृत्त - आनंदकंद
गण - गागालगा लगागा गागालगा लगागा
मात्रा - २४
गझल: 

प्रतिसाद

मी हारलो तुझ्याशी, जाणून डाव सारा;
माझ्या पराजयाला, हसरी किनार आहे...

हा  शेर  फारच  आवडला.

नीरज,
असे करू नये.
मतल्यातच एका ओळीचा दुसर्‍याशी संबंध नसणे वा लावणे कठीण जाणे म्हणजे एक ओळ इतिहासातील व एक भुगोलातील वाचण्यासारखे आहे की नाही?
काव्य विकायला काढल्यावर वेगळाच प्रचार झालाच तर ३ प्रश्नचिन्हे लावणे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सिगरेट ओढणार्‍याला जन्मठेप देण्यासारखा आहे की नाही?
प्रत्येक गझलेचे ( ? ) वृत्त व मात्रा सांगणे म्हणजे डोळस माणसांना ' हा आमचा मुलगा असून त्याने हिरवा शर्ट व काळी हाफ पँट घातली आहे' असे सांगण्यासारखे वाटते की नाही?
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?
 

वाहवा अतिशय सुन्दर गझल !!!

तिलकधारी  धनुर्धारी बरा वाटतो तसा. नीरजचे बाण पण छान आहेत. सोपे वृत्त, सोपे काफिया, चांगले अर्थ! छोटे शत्रू , नित्यातले बाण व चांगले यश! बाण आनंदीत झाला.

'हे काव्य आज माझे, विकण्यास काढले मी!!'
हा कोणता निराळा, होतो प्रचार आहे???

कलोअ चूभूद्याघ्या

आश्वासने मिळाली, मजला जरी खुन्यांची;
निश्चीत आज होणे, माझी शिकार आहे...

मी हारलो तुझ्याशी, जाणून डाव सारा;
माझ्या पराजयाला, हसरी किनार आहे...

निरज, अप्रतिम शेर!!