'गोष्टी '

--------------------------------
आधीच  मी  मनाशी, केल्या  तयार  गोष्टी
तू  भेटशील  तेव्हा, बोलू  हजार  गोष्टी...


बोलू  जरा  मनाचे, बोलू  कुणा-कुणाचे..
संपून  शब्द  जाता, आणू उधार  गोष्टी !


राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..


समजू  नका  मला  रे, इतका  निरूपयोगी
सांगू  शकेन  मी ही,  युक्तीत  चार  गोष्टी


गोष्टीत  शेवटाला, सारेच  गोड  होते
भलत्याच  भाबड्या या असतात  यार, गोष्टी !


ऐकून  गोष्ट  माझी,  भिजले  कितीक  डोळे..
कित्येक  पापण्यांना, होतात  भार गोष्टी


कविता, विकार, चष्मा, काठी, दिवा, बिछाना...
उरतात  सोबतीला, असल्या  चुकार  गोष्टी...!!


----------------------------------- 

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश,
असे करू नये. मधुनच एखादी उत्कृष्ट गझल करायची असे करू नये. सारख्या सारख्या कर बरे अशा गझला. हे आमच्या दिलीपकुमार सारखे किंवा सध्याच्या आमीरखानसारखे वाटते की नाही? वर्षाला एकच पिक्चर.
असे नाही करू.
मी आपला साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?

राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..
वा.

गोष्टीत  शेवटाला, सारेच  गोड  होते
भलत्याच  भाबड्या या असतात  यार, गोष्टी !
वा. छान. 

वरील शेरातला सपाटपणा कमी करता येईल.
गोष्टींत शेवटी का सारेच गोड होते ?
भलत्याच भाबड्या तू करतोस यार गोष्टी!
असे करून बघितले.







ज्ञानेशदा,
फार छान आणलेत खयाल...
मुळात मला संकल्पना आवडली

सर्वच शेर आवडले

शेवटचा शेर उत्कृष्ट बाण! धनुर्धार्‍याचे अभिनंदन!

@तिलकधारी- "अहो  आश्चर्यम..!"
@भट साहेब- तुम्ही  सुचवलेला बदल चांगला आहे.
@ह्रषिकेश- धन्यवाद.
@बाण- खच्याक !!!

गोष्टी ह्या रदीफाची निवड अतिशय आवडली आणि ते निभावले सुद्धा मस्त आहे..काफियांची निवड सुद्धा अगदी छान आहे.

राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..

समजू  नका  मला  रे, इतका  निरूपयोगी
सांगू  शकेन  मी ही,  युक्तीत  चार  गोष्टी ...

ऐकून  गोष्ट  माझी,  भिजले  कितीक  डोळे..
कित्येक  पापण्यांना, होतात  भार गोष्टी .. हे शेर विशेष आवडलेत..-मानस६



राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..
ऐकून  गोष्ट  माझी,  भिजले  कितीक  डोळे..
कित्येक  पापण्यांना, होतात  भार गोष्टी
कविता, विकार, चष्मा, काठी, दिवा, बिछाना...
उरतात  सोबतीला, असल्या  चुकार  गोष्टी...!!
कलोअ चूभूद्याघ्या

मला आप् कि क् वि ता फार आव् ड् लि.मि म्रराटि टाइप क्र्र्उ शक त नाइह

व्वा................
राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..
ऐकून  गोष्ट  माझी,  भिजले  कितीक  डोळे..
कित्येक  पापण्यांना, होतात  भार गोष्टी
कविता, विकार, चष्मा, काठी, दिवा, बिछाना...
उरतात  सोबतीला, असल्या  चुकार  गोष्टी...!!

शेवटचे तीन शेर तर आरपार.....!! चित्तंनी सुचवलेला बदल केला तर..... बहार येईल !!
गझल खूप आवडली !

mee ya websitechi regular visitor aahe.
pradip jee,pulastee jee, aani tumachya hi anek Gazals vaachat aale aahe.
tumha saaryanchya anek gazals mee(tumachya naavasahit) Orkut var hee scrap kelya aahet.
pan aatta paryant konatyahi gazalela pratisad dyava ase vaatale navahate.Yapekshahi saras ashya gazals yethe aalyahi aahet yavishayi prashnach nahi,pan tari hee gazal khas vaatali.
mala taantrik goshti samajat nahit.Gazal mala bhavate tee THET. kashi ka mahit nahi. agadi hee sudhdha tashich bahvali.
aani ho तिलकधारीकाका  je mhanale tyala mazahi dujora aahe.
All d Best for uor future.
n kp rocking all d way!

गझल फार आवडली.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चुकार,उधार,फार हे आवडले.

राहू  उभे  जरासे, पायावरी  स्वताच्या
आकाश  तोलण्याच्या  झाल्यात  फार  गोष्टी..

छानच!

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

मस्त गझल. खास शेर
बोलू  जरा  मनाचे, बोलू  कुणा-कुणाचे..
संपून  शब्द  जाता, आणू उधार  गोष्टी !
गोष्टीत  शेवटाला, सारेच  गोड  होते
भलत्याच  भाबड्या या असतात  यार, गोष्टी !
कविता, विकार, चष्मा, काठी, दिवा, बिछाना...
उरतात  सोबतीला, असल्या  चुकार  गोष्टी...!!
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}