असे करू नये १.

कोणी ना  बसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते
मी जेव्हा नसतो  तिच्याजवळ ती आगीपरी भासते


जाळो शायर ती पतंग जैसा, भासे गझल जादुई
जातो वापस तो तिच्याजवळ ती  आगीपरी भासते


दुनिये मत्सर तंत्र, मंत्र यांचा, प्रत्यक्ष ही कारणे
दाह असा  असतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते


सूर्याला चटका बसेल ऐशी, गझलेतली उष्णता
लाव्हा रसरसतो  तिच्याजवळ ती आगीपरी भासते


वाटे थंड किती तिच्यात बुडता, डोईवरी घागरी
नेणारा फसतो तिच्याजवळ ती आगीपरी भासते


 



 


 

गझल: 

प्रतिसाद

"मी जेव्हा नसतो  तिच्याजवळ ती आगीपरी भासते..."
तू  जेव्हा  तिच्याजवळ "नसतो" , तेव्हा ती  "आगीपरी" कशी  भासेल? 'बसतो' शी  यमक साधायचे, तर 'असतो' पण चालेल  ना? आणि  त्याला  किमान अर्थ तरी  प्राप्त  होईल.
मी  आपला  साईटवर वातावरण  गमतीदार  करण्यासाठी  येतो. राग नसावा. 
 

तिलकधारी?
असे करू नये.
तुझ्या तिसर्‍या व पाचव्या शेरांना स्वतंत्रपणे वाचले तर संदर्भ तरी लागेल का की हे सगळे कशाबद्दल आहे? ऑ? नाही की नाही? म्हणजे चार आंधळ्यांनी हत्ती कसा असतो हे सांगण्यासारखे होईल की नाही?
असे करू नये.
तू स्वतःच खेळकर वातावरणासाठी येतोस त्यामुळे तुला या विधानांचा राग येण्याचे काही कारणच नाही.
 

ही  गझल आहे. .. . . . .?

बापूजी?
असे करू नये. अगदी बरोब्बर! ही गझल नाही. यात गझलियत नाही. शेर चढत नाहीत.
तुम्ही प्रश्न विचारलात की ' ही गझल आहे? ' असे करू नये. स्पष्ट विधान असावे, की ही गझल नाही. असो.
दसर्‍याच्या शुभेच्छा! आता गझल या विषयावर जास्त चांगली चर्चा व्हावी म्हणुन मी खालीलपैकी एक  गोष्ट मान्य करण्याची  आपल्याला व इतरांना विनंती करतो.
१. यातील कुठलाही एक शेर गझल स्वरूपाचा करून द्या, ज्याने सरळ सरळ कविता व गझल यातील फरक स्पष्ट होईल.
२. हेच रदीफ काफिया वापरून अजून ३ शेर 'गझल आगीपरी भासते' या विषयावर करा. खरे तर असे प्रत्येक गझलवर करावे. असे केले की आपोआप आपण सर्व कवी उंचावर जायला लागतो.
आपल्या व ज्ञानेशच्या खेळकर प्रतिसादासाठी धन्यवाद!
प्रिय मित्र ज्ञानेश,
' मी जेव्हा नसतो' मधे कवीला असे म्हणायचे आहे की ज्यावेळी कवी जवळ नसतो तेव्हा गझलेची आग आग होते. तो जवळ आला की ती खूष होते. हा अर्थ ' असतो' मधे येणार नाही. असो. तुला शब्दार्थातून भाव लक्षात आला नाही हे तुझे नसून माझे अपयश आहे त्याबद्दल माफ कर.
अशीच मैत्री ठेव व खेळकर प्रतिसाद देत रहा.
धन्यवाद!
 

तिलकधारी...
"तुझ्या तिसर्‍या व पाचव्या शेरांना स्वतंत्रपणे वाचले तर संदर्भ तरी लागेल का की हे सगळे कशाबद्दल आहे?" 
अहो, माझ्या  सगळ्याच  गझलेत  तिसरे  आणि  पाचवे  शेर  आहेत. तुम्ही  कुठल्या गझलेबाबत  बोलताहात?
माझ्या  आक्षेपाला  उत्तर न देता, उगाच  माझ्या  एखाद्या  गझलेची  उणी-दुणी  काढून  स्वतःचे  हसे  करून घेऊ  नये.  हे  म्हणजे  बीन लादेनने ९/११ ची  खोडी  केल्याचे  निमित्त  करून  अमेरिकेने इराकवर  हल्ला करावा, असे झाले !
बाकी  मी  साईटवर  का येतो, हे तर तुम्हाला  एव्हाना  कळलेच असेल !