दुष्काळ....

फसव्या तुला शब्दांचा, कैसा विटाळ आहे?,
सांभाळुनी रहा तू, जग हे कुचाळ आहे,


आलास का परतुनी? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.


रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.


शोधू कुठे तुला मी? का काळजात माझ्या?,
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.


आता चर्चा कशाला? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.


दे लाघवी अश्रू मज, ही दिलखुलास माग,
हासून मुखवट्यांचा, झाला सुकाळ आहे.


(ये तू अता विठ्ठ्ला, तूझीच ओढ मजला,
वारीत माणसांचा, पडला दुष्काळ आहे.)


पूरे तुझे उसासे, स्वप्निल पापण्या ही,
ढळली 'निशा' पहाटे, झाली सकाळ आहे.


वृत्त: आनंदकंद { --U-U-- /--U-U-- }
***********************निशा[चांदणी]

गझल: 

प्रतिसाद

सकाळची मधाळ चांदणी छान.

काही ठिकाणी वृत्त सांभाळलेले गेलेले दिसत नाही.

उदाहरणार्थ
१. फसव्या तुला शब्दांचा, कैसा विटाळ आहे?,
२. दे लाघवी अश्रू मज, ही दिलखुलास माग,
३. आता चर्चा कशाला? वैतागलास का तू?
४.ये तू अता विठ्ठ्ला, तूझीच ओढ मजला,
५.वारीत माणसांचा, पडला दुष्काळ आहे.)

ह्या ओळींचे वृत्त तपासून बघा आणि शक्य झाल्यास बदल करा.  जसे आता कशास चर्चा? वैतागलास का तू असे करता येईल.

तंत्रशुद्ध नसलेल्या रचना कालांतराने/वेळ मिळेल तसे/लक्षात येईल तेव्हा विचाराधीन करण्यात येतात, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.

फसव्या तुला शब्दांचा
आता चर्चा कशाला?
ये तू अता विठ्ठ्ला
तूझीच ओढ मजला,
पडला दुष्काळ आहे.
पूरे तुझे उसासे
सन्माननीय चांदणी,
वरील विधानात आनंदकंद गडबडतंय असे वाटते.
तसेच 'तूझीच' व 'पूरे' हे आनंदकंदासाठी दीर्घ केले आहेत असे वाटते.
माफ करा. पण येथे ही चर्चा होणार हे गृहीत धरणे आवश्यक आहे.
मी हासते जराशी प्रमाणेच झाली गहाळ आहे मधे झाले घेतलेकी चांगले वाटेल.
अशाच चर्चेमुळे वादही होतात पण उपयोगही होतो. मला झाला आहे असे मला तरी वाटते. माझ्या आधीच्या गझला या गझलाच नव्हत्या. अजूनही गझला गझला असतीलच असे नाही, पण निदान कुणी हे तरी म्हणत नाहीये की वृत्तातच बसत नाही.
आशयः
१.बर्‍याच शेरांचा अर्थ समजलाच नाही. हा कदाचित आपला दोष नसून माझा असावा. काळजी करू नका. माझा हा प्रॉब्लेम बराच जुना आहे.
२. काही शेरांमधील आशय साधा वाटतो. जरी यावरही बोलण्याचा पुरेसा अधिकार 'एक गझलसदॄश रचना करणारा' म्हणुन मला नसला तरी एक छोटा अभ्यासक म्हणुन असावा. एका ठिकाणी असे वाचले होते; की साधी सरळ अर्थाची विधाने शेर म्हणुन लिहिणे योग्य नसून त्यात या तीन पैकी काहीतरी असणे गझलेचे मूल्य वाढवते.
अ - धक्कातंत्र
ब - विरोधाभास
क -उपमा
सन्माननीय चांदणी - माझ्या या वरील विधानांबाबतः
१. ती योग्य आहेत किंवा नाहीत ते तज्ञ सांगतीलच.
२. आपण राग मानू नये.
धन्यवाद!
 
 
 

 

असे करू नये.
वृत्त सांगायचं अन पाळायचं नाही म्हणजे अमेरिकेच्या अण्वस्त्रमुक्ततेच्या आश्वासनांसारखे वाटते की नाही?
काय करावे हे कुणीतरी सांगेलच.
मी फक्त साईटवर हलके फुलके संवाद व्हावेत व वातावरण आनंदी व खेळकर रहावे म्हणुन येतो. बर का?

फसव्या तुला जगाचा, कैसा विटाळ आहे?,
सांभळुनी रहा तू, जग हे कुचाळ आहे.
आलास का परतुनी? देण्यास घाव आता,
केलास वार जो तू, तो ही मधाळ आहे.
रागावता असा तू, मी हासते जराशी,
व्यर्थ तुझेच कोपन, इतुके मवाळ आहे.
शोधू कुठे तुला मी? का काळजात माझ्या?,
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.
देशील आसवे का? ही दिलखुलास माग
हासून मुखवट्यांचा, झाला सुकाळ आहे.
आता कशास चर्चा? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.
ये तू अता विठोबा, तूझीच ओढ मजला,
वारीत माणसांचा, ओसाड माळ आहे.
पूरे तुझे उसासे, स्वप्निल पापण्या ही,
ढळली निशा पहाटे, झाली सकाळ आहे.
वृत्त: आनंदकंद { --U-U-- /--U-U-- }
***********************निशा[चांदणी]
विश्वस्त यांनी केलेली सुचना मी स्वीकारत आहे, तुमचे मनापासुन आभार!!

असे करू नये!
सूचना स्वीकारली असे सांगून न स्वीकारणे म्हणजे भारताने वारंवार इशारे देऊनही अतिरेक्यांनी बॉम्ब्स्फोट करण्यासारखे आहे की नाही?
नका हो करू असे! असे करा हवे तर!
व्यर्थ तुझेच कोपन ( हा कोप व्यर्थ आहे )
ही दिलखुलास माग (मी दिलखुलास मागे )
तूझीच ओढ मजला ( ओढी तुझीच मजला )
पूरे तुझे उसासे ( झाले पुरे उसासे )
बाकी आणखी एक सांगू का? ढळली निशा पहाटे हा शेर उत्तम. आता आपलेच नांव आहे ते वेगळे, पण मुळात शेराचा अर्थ छान आहे. विठ्ठलाचे विठोबा केलेत ते चांगले केलेत. त्याला तसा फारसा फरक पडत नाही ( विठोबाला ). वाघोबा काय अन वाघ काय, खातोच, मग वाघ्याच म्हणा! तसे विठ्ठ्ला काय अन विठोबा काय, पावतोच. मग विठ्यासुद्धा म्हणा!
फक्त जरा ते झाली गहाळ चे झाले गहाळ करा ना जाता जाता! वाचकांची गैरसोय नको व्हायला.
मी आपला या साईटवरचे वातावरण खेळकर व आनंदी रहावे म्हणुन येतो. बर का?

 

बदलांसहीत छान.
आता कशास चर्चा? वैतागलास का तू?
नादान मी अशी ही, थोडी खट्याळ आहे.
तरी चर्चा होतेच की
रे अंतरी तुझ्या मी, झाली गहाळ आहे.
छान.

व्वा...........

फसव्या तुला शब्दांचा, कैसा विटाळ आहे?,
सांभाळुनी रहा तू, जग हे कुचाळ आहे,