लाघवीशी वाटते आहे
सुरांची रागदारी लाघवीशी वाटते आहे
छटा ही जीवनाची भैरवीशी वाटते आहे
तिची ही गाठ केसांची सुटावी एकदापुरती
मनाला आज विश्रांती हवीशी वाटते आहे
कसे इच्छेस हाताळू ,हिला दाबू, तिला सोडू
निघे जी जी मनातुन ती नवीशी वाटते आहे ( सुचले - हजारो ख्वाहिशे वरून- गालिब )
'सुचावे ना चुकीनेही तिला मी यापुढे आता'
तिची ही मागणीही वाजवीशी वाटते आहे
जगाला नोकरी माझ्या चुकांची नोंद घेण्याची
चुका करण्यात आता थोरवीशी वाटते आहे
जरा लाजायचो स्वीकारताना आग्रही दु:खे
नशा त्यांच्यात आता माधवीशी वाटते आहे
जरी वस्त्रांत गुंडाळी तने, खोटी मने भेटी
प्रजा येथील सारी नागवीशी वाटते आहे
नभा माजू नको लोकांपरी, थोडी क्षितीजे बघ
तुझीही मान तेथे ओणवीशी वाटते आहे
गझल:
प्रतिसाद
तिलकधारी (not verified)
शुक्र, 03/10/2008 - 10:37
Permalink
घोटाळा!
ती नवीशी
वा जवीशी
थो रवीशी
नवल नाही की चुका करण्यात आता थोरवीशी वाटते आहे!
अजय अनंत जोशी
शुक्र, 03/10/2008 - 12:21
Permalink
काहीतरी..
वेगळेच (अवघड) वाटते आहे. आणखी एक घ्या.
उभा युद्धास तो शत्रूंपुढे पण गांडिवा त्यागे...
तशी दोस्ती तुझीही जान्हवीशी वाटते आहे
क.लो.अ.
चूभूद्याघ्या.
ज्ञानेश.
शुक्र, 03/10/2008 - 13:54
Permalink
सुरेख...
संपुर्ण रचना अगदी तालबद्ध.. आणि अर्थपुर्ण आहे.
जगाला नोकरी माझ्या चुकांची नोंद घेण्याची
चुका करण्यात आता थोरवीशी वाटते आहे
हा शेर सर्वाधिक आवडला. 'वाजवी' आणि गालिब inspired शेरही मस्त..
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 03/10/2008 - 14:25
Permalink
व्वा
'सुचावे ना चुकीनेही तिला मी यापुढे आता'
तिची ही मागणीही वाजवीशी वाटते आहे
नभा माजू नको लोकांपरी, थोडी क्षितीजे बघ
तुझीही मान तेथे ओणवीशी वाटते आहेफारच मस्त शेर होऊ शकतो हा! (लोकांपरी खटकतोय)
मानस६
शुक्र, 03/10/2008 - 15:57
Permalink
मनाला आज विश्रांती..
तिची ही गाठ केसांची सुटावी एकदापुरती
मनाला आज विश्रांती हवीशी वाटते आहे
कसे इच्छेस हाताळू ,हिला दाबू, तिला सोडू
निघे जी जी मनातुन ती नवीशी वाटते आहे . हे शेर आवडलेत
-मानस६