मनास केले असे मोकळे
मनास केले असे मोकळे, क्षितीज उरले नाही
जरी एवढा प्रवास केला, गाव शोधले नाही
मनास केले असे मोकळे, क्षितीज उरले नाही
टपटपणाऱ्या आठवणींना बघून तेव्हा दारी
भिजले मन हे जराजरासे.. पण हळहळले नाही
'उंबरठा झाला पर्वत की रस्त्याने थांबवले?
भेटण्यास ना येण्याचे मज कारण कळले नाही
देठ मनाचा नाजुक पण तो अजून ताठच आहे
(कोण म्हणाले मी सुमनांना, तोलून धरले नाही)
पहा कोपरा अस्तित्त्वाचा झाडून टाकला मी
पण माझे घर त्याने अजून का चकाकले नाही?.
मनात एका घोळत होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही
-सोनाली जोशी
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
गुरु, 25/09/2008 - 12:13
Permalink
देठ
देठ मनाचा नाजुक पण तो अजून ताठच आहे
(कोण म्हणाले मी सुमनांना, तोलून धरले नाही)
मनात एका घोळत होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही
हे शेर चांगले वाटले. अस्तित्व व हळहळले हे दोन शेर उत्तम! आपण घेतलेल्या काफियांमधे आणखी शेर बसतील. धन्यवाद व शुभेच्छा!
केदार पाटणकर
शनि, 27/09/2008 - 23:10
Permalink
पापुद्रे
चांगली रचना.
एकेका शेरात मनाचे पापुद्रे आहेत.
दशरथयादव
गुरु, 26/02/2009 - 21:01
Permalink
व्वा..छान. प
व्वा..छान.
पहा कोपरा अस्तित्त्वाचा झाडून टाकला मी
पण माझे घर त्याने अजून का चकाकले नाही?.
मनात एका घोळत होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही
जयन्ता५२
शुक्र, 27/02/2009 - 01:26
Permalink
'उंबरठा झाला पर्वत की रस्त्याने थांबवले
उंबरठा झाला पर्वत की रस्त्याने थांबवले..
हा शेर खास!
जयन्ता५२
वैभव जोशी
शुक्र, 27/02/2009 - 12:23
Permalink
मनात एका
मनात एका घोळत होता विचार काहीबाही....
पण दुसरे मन पक्के इतके, बिलकुल चळले नाही
झकास