गझल तालात चालावी
Posted by भूषण कटककर on Thursday, 18 September 2008
जरी बेताल मी माझी गझल तालात चालावी
सदा रंगीन वाटावी तिन्ही कालात चालावी
असावे मी नसावे मी तयाचे फारसे नाही
तिची जादू जगी या शेकडो सालात चालावी
तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी
असो खोडी तिला लाडीकशी की गुदगुली व्हावी
प्रियेची जीभ लाजेने जशी गालात चालावी
जगाच्या कारभाराची करावी चौकशी त्याने
दिला जाईल जो देवास, अहवालात चालावी
गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 19/09/2008 - 12:57
Permalink
चांगला शेर
तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी
ज्ञानेश.
शुक्र, 19/09/2008 - 17:35
Permalink
वा!
मस्त आहे गझल. अगदी 'तालात.'
"प्रियेची जीभ लाजेने जशी गालात चालावी"- गुदगुली करणारी ओळ.
अजय अनंत जोशी
शुक्र, 19/09/2008 - 22:59
Permalink
सहमत
समीरशी सहमत.
तिला ना वावडे दु:खे, सुखे, भीती नि मोहाचे
मनाचा जो असावा हाल त्या हालात चालावी
केदार पाटणकर
शनि, 20/09/2008 - 22:20
Permalink
निराळा रदीफ
भूषण,
निराळा रदीफ आहे. रदीफ काफिया चांगल्या रीतीने चालवले आहेत.
शेवटच्या शेराचा ्अर्थ कृपया स्पष्ट करावा.
असो खोडी...हा गोड शेर आहे.
भूषण कटककर
सोम, 22/09/2008 - 10:15
Permalink
धन्यवाद व अभिप्रेत अर्थ
धन्यवाद समीर, ज्ञानेश, अजय व केदार.
शेवटच्या शेरात मला अभिप्रेत अर्थ नीट मांडता आलेला नाही.
असे म्हणायचे होते की जेव्हा देव विचारेल की तुमच्या या भूतलावर कायकाय केलेत सांगा, तेव्हा त्याला जो अहवाल दिला जाईल त्यात माझ्या गझलेचा उल्लेख असावा. हा हा. एक आपली उद्दाम इच्छा!