वेळ जावा लागतो...
--------------------------------------
माणसे समजावयाला वेळ जावा लागतो
माणसे बदलावयाला वेळ जावा लागतो...
देवळे उधळावयाला फारसा नाही तरी,
देवळे बनवावयाला वेळ जावा लागतो
आपल्याही माणसांना ठोकरावे लागते,
अर्जुना उमगावयाला वेळ जावा लागतो
मागतो मी सांडत्या तार्यास काही आजही,
भाबडेपण जावयाला वेळ जावा लागतो...
"का मनाचे घाव ओले?" प्रश्न का पडला तुला?
साजणी, विसरावयाला वेळ जावा लागतो !
हासण्याचे अर्थ माझ्या, वेगळे काढू नका
आसवे उतरावयाला वेळ जावा लागतो...
रे प्रवाशा! तप्त देशी चालणे ना थांबवी,
चांदणे बरसावयाला वेळ जावा लागतो...
हो, कविता जन्म घेते रोज माझ्या अंतरी
'काफिये' जमवावयाला वेळ जावा लागतो....
--------------------------------------
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शनि, 13/09/2008 - 14:05
Permalink
पाटीलसाहेब?
पाटीलसाहेब?
आपण कशासाठी मार्गदर्शन मागत होतात काल?
काय गझल बनलीय? सॉलीड! मजा आली.
ते रदीफा मिरवती आणि अलामत सांधती
आशयाचा रंग कळण्या वेळ जावा लागतो -
अजय अनंत जोशी
शनि, 13/09/2008 - 18:01
Permalink
हे...
आपल्याही माणसांना ठोकरावे लागते,
अर्जुना उमगावयाला वेळ जावा लागतो
मागतो मी सांडत्या तार्यास काही आजही,
भाबडेपण जावयाला वेळ जावा लागतो...
छान.
ज्ञानेश.
सोम, 15/09/2008 - 09:51
Permalink
आभार!
सर्वांचे आभार...
हा अजून एक शेर- (उशिरा सुचलेला)
"धीर नाही सोडला मी, जाणतो हे सत्य की,
वादळे परतावयाला वेळ जावा लागतो..."
रसिक (not verified)
सोम, 15/09/2008 - 15:01
Permalink
सहज
सहज गुणगुणण्यासारखी गझल!