वगैरे...
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे
बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे
कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे
तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे
असे ऐकले शेवटी न्याय होतो..
पुढे काय झाले "निठारी" वगैरे..?
किती जीवना रोज देतोस धमक्या
दिली का यमाने सुपारी वगैरे
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 08/09/2008 - 13:05
Permalink
सुरेख!!!
गझल सुरेख आणि खणखणीत आहे हे सांगणे न लगे. वगैरे हे अन्त्ययमकही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे
वाव्वा!! चर्येचा बदल चांगला.
कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे
वाव्वा!!
तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे
वाव्वा!!
हे तीन शेर विशेष!
भूषण कटककर
सोम, 08/09/2008 - 13:13
Permalink
आह!
आह! वैभव साहेब? अप्रतिम! 'वगैरे' फिट्ट बसलंय. प्रत्येक ठिकाणी.
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे
हा शेर दी बेस्ट!
प्रदीप कुलकर्णी
सोम, 08/09/2008 - 15:54
Permalink
अप्रतिम...
स्वागत, वैभवराव....
पुनरागमन केलेत, हे छान झाले...
सगळी गझल आवडली...
आता भेटत जा इथे वरचे वर !
मिल्या
सोम, 08/09/2008 - 16:11
Permalink
वा वा!!!
तुझ्या तोंडून ऐकली तेव्हा मजा आलीच होती
आता परत वाचताना तितकीच आवडली...
तो 'बिहारी' शेर का नाही टाकलास?
अजय अनंत जोशी
सोम, 08/09/2008 - 16:28
Permalink
सर्वच
पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे
बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे
कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे
तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे
असे ऐकले शेवटी न्याय होतो..
पुढे काय झाले "निठारी" वगैरे..?
सर्वच आवडले शिसारी, पुढारी वगैरे..वगैरे..
केदार पाटणकर
सोम, 08/09/2008 - 16:38
Permalink
चपखल
वगैरे हा रदीफच आगळा वेगळा आहे.
प्रत्येक शेरात तो चपखल बसत आहे. अशा रदीफांमुळे गझल अधिक आव्हानात्मक होते.
सुंदर...!
खरे पाहता पेच आहेच कोठे ?
तुझी मात्र चर्या ..विचारी ..वगैरे
असे केले तर ?
नचिकेत
मंगळ, 09/09/2008 - 11:14
Permalink
वा!!!
वैभव,
पुर्ण गझल आवडली. मस्तच रे!!!
तुझी मात्र चर्या - बदल आवडला.
२-३ शेर विसरलास वाटतं टाकायला?
-नचिकेत
६४-बिट्स
मंगळ, 09/09/2008 - 16:47
Permalink
आता ही गझल लाजवाबच झाली.
वैभव साहेब,
आता ही गझल लाजवाबच झाली. मला अंदाज होता की तुम्ही / संपादक /विश्वस्त तो शेर मागे घेणार. बिहारींची समस्या सगळ्यांनाच सलते आहे. त्या वर आपणच दुसरी कडे जाऊन वसणे कितपत योग्य आहे ? त्याच्याशी मुकाबला करावा लागेल. असो.... निठारीच्या शेराचे आयुष्य फार तर एखादे वर्ष. प्रासंगिक शेरांची धार फार काळ टिकत नाही.
या गझलेत बाकीचे शेर तर आहेतच सुरेख . भिकारी ,सुपारीचे शेर तर लाजवाब आहेत.
तुमची अजून एक ध्वनी मुद्रिका निघावी, ही सदिच्छा आणि शुभेच्छा. आता या गझलेलाही कुणी तरी गायक मिळावा...
(जो भाग आवश्यक वाटला नाही, तो भाग वगळला आहे. मजकुराची फेररचनाही केलेली आहे - विश्वस्त)
राजरत्न९९९
मंगळ, 09/09/2008 - 18:21
Permalink
वा !
आदरणीय वैभव जी,
गझल खरच मना पासुन आवड्ली...
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे
एकदम झक्कास !
"याला म्हणतात गझल ....
झिन्ग हिचि न्यारि.. खुमारी वगैरे"
राजरत्न
पुलस्ति
मंगळ, 09/09/2008 - 18:34
Permalink
वा वा!!
विचारी, पुढारी आणि सुपारी हे शेर तर फार फार आवडले!!
मानस६
मंगळ, 09/09/2008 - 21:08
Permalink
वगैरे
वगैरे हे रदीफ भावले...सगळेच शेर फर्मास.. अभिनंदन
-मानस६
अनंत ढवळे
मंगळ, 09/09/2008 - 22:46
Permalink
सुगंधी
खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे
सुंदर शेर आहेत !
योगेश वैद्य
मंगळ, 09/09/2008 - 23:14
Permalink
वैभव
फार फार वगैरे आवडली गझल.
आजानुकर्ण
मंगळ, 09/09/2008 - 23:20
Permalink
सुरेख
वैभवराव, गझल आवडली. सुपारीचा आणि शिसारी हे शेर विशेष आवडले
अनिरुद्ध अभ्यंकर
बुध, 10/09/2008 - 13:31
Permalink
वा!!
वैभव,
गझल उत्तम..
कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे
अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे
तिथे एकटा तोच होता दरिद्री
रुबाबात होते पुजारी वगैरे
हे शेर विशेष आवडले..
अनिरुद्ध