स्वतंत्रता दिनाचे रुदन
भाषणबाजीने नटलेला देशभक्तीचा आव होता
बोलुन गेले अनेक आणखी खाजविण्याला वाव होता
विषय फालतू बोलत होते, मोठेपण ते सांगत होते..
समजत नव्हते मागे-पुढे आणखी कोणता डाव होता?
रक्त सांडले या भूमीवर वीरांना त्या वंदन करण्या..
जमला मेळा बाजारी आणि सांगत अपुला भाव होता
अपुला अपुला झेंडा रोवुन रक्त कोणते गेले सांडुन?
स्वार्थाचे हत्यार पाजळुन क्रांतिवीरांवर घाव होता
कुणासच नव्हते भान दिसाचे कशासाठी जमले सारे..
आणि मौज मजेला कंटाळुन गेला सारा गाव होता
गझल:
प्रतिसाद
मख्मूर (not verified)
शनि, 06/09/2008 - 01:39
Permalink
रडकि ग़ज़ल
हि रडकि ग़ज़ल आहे. जोशी यांणी तिनदा विचार करायला हवा ग़ज़ल लिहीन्यापुर्वी.
nakkal (not verified)
शनि, 06/09/2008 - 02:35
Permalink
-खरी नक्कल
मख्मूर भावोजी,
तुम्ही अशिक्षितपणा, आगाऊपणा, अशुद्ध मराठी आणि त्रुटीयुक्त टंकलेखन इत्यादीची खरी नक्कल केली नाही. म्हणून मी तुम्हाला बिल्कुल दाद देणार नाही
मी फक्त खरी नक्कल असेल तरच दाद देते.
-खरी नक्कल
भूषण कटककर
शनि, 06/09/2008 - 13:37
Permalink
रडकी गझल
श्रीयुत मख्मूर,
रडकी गझल म्हणजे काय? आता गझलमधे काय विषय असावेत हाही 'णि'यम कर'ना'र का?
सौ. खरी नक्कल,
आपला प्रतिसाद आवडला. आपण मधुन मधुन गझलेवरही भाष्य करावेत अशी विनंती.
श्री अजय,
'गझलमधे एक शेर ही एक छोटी परिपूर्ण कविता असते' हे मत जर ग्राह्य धरले तर 'आपल्या वरील गझलेची सुरुवात वाचल्याशिवाय दुसर्या व पाचव्या शेरांचा संदर्भ लक्षात येईलच' असे नाही असे वाटते.
म्हणजे, हे जे शेर आहेत ते कशाबद्दल आहेत हे पहिला शेर वाचल्याशिवाय कळणार नाही असे माझे मत आहे.
विषय फालतू बोलत होते, मोठेपण ते सांगत होते..
समजत नव्हते मागे-पुढे आणखी कोणता डाव होता?
कुणासच नव्हते भान दिसाचे कशासाठी जमले सारे..
आणि मौज मजेला कंटाळुन गेला सारा गाव होता
यावर आपले काय मत आहे?