ही गझल आणि एक सांगाडा
Posted by भूषण कटककर on Thursday, 4 September 2008
आज माझ्या मनात आलो की
एक जोमात पार झालो की
भेट घेईन माणसांचीही
मी जगातून या पळालोकी
कायदे पाळणे गुन्हा आहे
'कायदा हाच', जा अशा लोकी
बेवफाई तुझी न वाटावी
याचसाठी मरू म्हणालो की
मी तुला आवडेन खात्रीने
साजणी आणखी कळालो की
काय खोटे तुझे इरादे हे
होत डोळे तुझे गळालो की
ही गझल आणि एक सांगाडा
लाभ होईल मी जळालो की
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
गुरु, 04/09/2008 - 13:07
Permalink
यादगार
श्री यादगार,
धन्यवाद! आपल्याला माझी एखादी ओळ आवडणे हे माझ्या काही ध्येयांपैकी एक आहे.