द्वैत जन्मातले सरे बंधो...
हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो
काळ बुजवून टाकतो वाटा
कोण कोणास विस्मरे बंधो
देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे बंधो
कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो
एक बेअंत धून दाटू दे
द्वैत जन्मातले सरे बंधो ....
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 02/09/2008 - 15:03
Permalink
पहिला शेर
पहिला शेर छान आहे.
समीर चव्हाण (not verified)
मंगळ, 02/09/2008 - 15:37
Permalink
सुंदर शेर
हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो
देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे ...
ही आवडले
चित्तरंजन भट
बुध, 03/09/2008 - 23:06
Permalink
हट्ट माझा तुझा पुरे बंधो
हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो
वा. शेर अगदी समयोचित आहे.
कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो
वाव्वाव्वा...फारच आवडला हा शेर....
पुलस्ति
गुरु, 04/09/2008 - 00:55
Permalink
वा!
काळ आणि लक्तरे हे शेर अतिशय आवडले!
अजय अनंत जोशी
शुक्र, 05/09/2008 - 23:22
Permalink
सर्वच.
हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो
काळ बुजवून टाकतो वाटा
कोण कोणास विस्मरे बंधो
देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे बंधो
कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो
एक बेअंत धून दाटू दे
द्वैत जन्मातले सरे बंधो ....
सर्वच उत्तम.
मख्मूर (not verified)
शनि, 06/09/2008 - 01:30
Permalink
बेअंत उर्दु आहे
गझल छाणच आहे. पण बेअंत उर्दु आहे. ग़ज़ल उर्दु प्रभावाखालची वाटते.
अनंत ढवळे
मंगळ, 09/09/2008 - 22:39
Permalink
बेअंत
होय बेअंत उर्दूत वापरला जातो..त्यातही अंत संस्कृतातला आहेच की..भाषिक देवाण्घेवाण जुनीच प्रक्रिया आहे...बाकी उर्दू प्रभावाबद्द्ल आणखी मार्गदर्शन :) करावे ! शिवाय ' ग़ज़ल ' हा शब्द नेमक्या ़ कुठल्या लिपीतील आहे , ते ही सांगावे !
बाण
बुध, 10/09/2008 - 11:16
Permalink
आईसारखी
मुलगी आईसारखी दिसतेच. पण ती स्वतः वागते कशी, राहते कशी, बोलते कशी, सासरी नांदते कशी हेही बघितले पाहिजे मख्मूर मियाँ. बाण आहे म्हणुन सोडु नये.
अनिरुद्ध अभ्यंकर
बुध, 10/09/2008 - 13:36
Permalink
वा!!
अनंत,
अप्रतिम गझल.. सर्व शेर आवडले..
अनिरुद्ध