गझल - अनंत ढवळे
एक औदासिन्य मागे राहिले
शेवटी हे शुन्य मागे राहिले
पांगले सर्वत्र निष्ठांचे धनी
आपले सौजन्य मागे राहिले
वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले
संपले सौहार्द्र संबंधातले
कोरडे पर्जन्य मागे राहिले
घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले
अनंत ढवळे
गणयोगी अपार्टमेंट्स
साई पॅलेस लेन
वडगाव (बु.)
पुणे-४११ ०४१
भ्रमणध्वनी - ९८२३०८९६७४
शेवटी हे शुन्य मागे राहिले
पांगले सर्वत्र निष्ठांचे धनी
आपले सौजन्य मागे राहिले
वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले
संपले सौहार्द्र संबंधातले
कोरडे पर्जन्य मागे राहिले
घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले
अनंत ढवळे
गणयोगी अपार्टमेंट्स
साई पॅलेस लेन
वडगाव (बु.)
पुणे-४११ ०४१
भ्रमणध्वनी - ९८२३०८९६७४
गझल:
प्रतिसाद
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 27/04/2007 - 11:27
Permalink
मागे राहिले हा रदीफ
मागे राहिले हा रदीफ ताकदीने निभावला आहे.
सुंदर गझल.
विसुनाना
शुक्र, 27/04/2007 - 12:59
Permalink
निष्ठांचे धनी...
वा! वा! एक गझल मनात घर करणारी.
खर्जातली.
बेफिकीर
गुरु, 25/02/2010 - 19:54
Permalink
मुशायर्याची तयारी करताना ही
मुशायर्याची तयारी करताना ही गझल आढळली.
व्वा!
उत्तम गझल अनंतराव!
ऋत्विक फाटक
गुरु, 25/02/2010 - 20:02
Permalink
संपले सौहार्द्र
संपले सौहार्द्र संबंधातले
कोरडे पर्जन्य मागे राहिले
घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले
व्वा! व्वा!
सध्या मुंबईत असलो तरी माझं घर माणिकबागेत आहे..
एकदा अवश्य भेटूया!
गंगाधर मुटे
शनि, 27/02/2010 - 05:36
Permalink
सुंदर गझल.
सुंदर गझल.
अनंत ढवळे
रवि, 28/02/2010 - 14:43
Permalink
ही गझल पोस्ट करून तब्बल तीन
ही गझल पोस्ट करून तब्बल तीन वर्षं झालिएत ! आता पत्तादेखील बदलला आहे :-)
अजय अनंत जोशी
सोम, 01/03/2010 - 23:35
Permalink
कोरडे पर्जन्य - छानच.
कोरडे पर्जन्य - छानच.
प्रताप
मंगळ, 02/03/2010 - 08:03
Permalink
खुप आवडली. कोरडे पर्जन्य,
खुप आवडली. कोरडे पर्जन्य, मृत्तिका जवळचे वाटले.
ह बा
मंगळ, 25/05/2010 - 17:25
Permalink
वाहुनी गेली किती
वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले
घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले
संपुर्ण गझल सुंदर!!!
मिल्या
गुरु, 27/05/2010 - 18:57
Permalink
व्वा पर्जन्य , मृत्तिका मला
व्वा पर्जन्य , मृत्तिका मला पण आवडले हे दोन शेर