घृणा... !
..........................
घृणा... !
..........................
कुणीतरी येईल...कधीतरी येईल !
खुळ्याच मी आशेत...खुशी घरी येईल !
घृणा... !
..........................
कुणीतरी येईल...कधीतरी येईल !
खुळ्याच मी आशेत...खुशी घरी येईल !
बरोबरी केलीस...बरेच हे केलेस...!
तुझी किती येऊन सरासरी येईल ??
उगाच मी स्वप्नात रमे कधीपासून...
उदास आयुष्यास कळा बरी येईल !
निघून सारी लाज हसायचे लाचार...
घडी अशी निर्लज्ज, निलाजरी येईल !
नवे नवे सारेच...अनोळखी गावात...
जुने कुणी भेटेल...मजा खरी येईल !!
नसेल अस्तित्वात जगात जी कोठेच...
म्हणे, तुझी होण्यास अशी परी येईल !!
पल्याडचा आनंद अल्याड मी आणीन...
जरी नव्या घाटात नवी दरी येईल !
उभे मला केले न कधीच तू दारात...
कधीतरी ही वेळ तुझ्यावरी येईल!!
कठोर मी होईन...मला सजा देईन...
घृणा मला माझीच जरा जरी येईल !
- प्रदीप कुलकर्णी
गझल:
प्रतिसाद
सोनाली जोशी
गुरु, 28/08/2008 - 02:25
Permalink
मस्त
गझल आवडली.
परी, दरी, तुझ्यावरी हे शेर एकदम मस्त
६४-बिट्स
गुरु, 28/08/2008 - 03:04
Permalink
युरेका ! युरेका !! युरेका !!!
युरेका ! युरेका !! युरेका !!! समाधान होईल असे नाविन्य सापडले यादगार यांना मी या बद्दलच बोलत होतो नेमके तेच या गझलेत आहे. कुठेच शिळेपणा वाटत नाही या गझलेत.
प्रदीप साहेब एकदम फ्रेश वाटलं ,जास्त आनंद झाला की मराठी गझलेत अजून नवलाई टिकून आहे या बद्दल.
बरोबरी केलीस...बरेच हे केलेस...!
तुझी किती येऊन सरासरी येईल ??
नवे नवे सारेच...अनोळखी गावात...
जुने कुणी भेटेल...मजा खरी येईल !!
उभे मला केले न कधीच तू दारात...
कधीतरी ही वेळ तुझ्यावरी येईल!!
कठोर मी होईन...मला सजा देईन...
घृणा मला माझीच जरा जरी येईल !
बहोत बढिया , ला-जवाब
६४-बिट्स
अजय अनंत जोशी
गुरु, 28/08/2008 - 08:24
Permalink
केवळ अप्रतिम!
पल्याडचा आनंद अल्याड मी आणीन...
जरी नव्या घाटात नवी दरी येईल !
फारच सुरेख.
मनामनांचे पूल तिथेच मी बांधीन
जिथे सुनामी, पूर नदीवरी येईल
असेच आपले सुचले.
भूषण कटककर
गुरु, 28/08/2008 - 15:07
Permalink
युगे
युगे लोटलीत तुजला मी पाहून
तरी काळजी याद बोचरी येईल
चित्तरंजन भट
गुरु, 28/08/2008 - 15:15
Permalink
तुझी किती येऊन सरासरी येईल ??
बरोबरी केलीस...बरेच हे केलेस...!
तुझी किती येऊन सरासरी येईल ??
वाव्वा.. क्या बात है... अतिशय आवडला शेर. एकंदर गझलही
पुलस्ति
शुक्र, 29/08/2008 - 18:04
Permalink
वा!
सरासरी आणि दरी हे शेर फार फार आवडले!!
समीर चव्हाण (not verified)
शुक्र, 29/08/2008 - 21:38
Permalink
वा
नवे नवे सारेच...अनोळखी गावात...
जुने कुणी भेटेल...मजा खरी येईल !!
तसेच
कठोर मी होईन...मला सजा देईन...
घृणा मला माझीच जरा जरी येईल !
आवडले
व्रुत्त चांगले निभावलेय, विशॅशकरून शेवटचा लघु कुठेच खटकत नाही...