वखवखे मला
सहज सांगतात दोष सारखे मला
करत राहतात लोक पारखे मला
वलय आखतात आखतात वर्तुळे
टाकताच पाय बोचती नखे मला
वाटणी समान जाहलीशी वाटते
स्वर्ग त्यास लाभले नी दोजखे मला
माझी वाट पाहते समजताच मी
पाहते अशी जशी न ओळखे मला
नाजुकी तुझी फुलाहुनी अधीक तर
सांग माळतेस का फुले सखे मला
पळभरी सुखात गुंतलो मी पाहुनी
दु:ख शोधण्यास काय वखवखे मला
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 27/08/2008 - 00:54
Permalink
माझा प्रतिसाद
सहज सांगतात दोष सारखे मला
करत राहतात लोक पारखे मला
दोन ओळींतला संबंध कळला नाही. कृपया समजावून सांगाल काय?
वलय आखतात आखतात वर्तुळे
टाकताच पाय बोचती नखे मला
छान
वाटणी समान जाहलीशी वाटते
स्वर्ग त्यास लाभले नी दोजखे मलादोजख हा उर्दू शब्द आहे. दोजखे मराठीत वापरणे योग्य ठरणार नाही. चूक भूल द्या घ्या.
माझी वाट पाहते समजताच मी
पाहते अशी जशी न ओळखे मला
वरची ओळ लयीत गुणगुणताना, बोलताना अडचण होते आहे.
नाजुकी तुझी फुलाहुनी अधीक तर
सांग माळतेस का फुले सखे मलानेहमीचे. पण छान. मला हे रदीफ असे आले आहे की सखी कवीला फुले माळत असावी असे वाटावे.
पळभरी सुखात गुंतलो मी पाहुनी
दु:ख शोधण्यास काय वखवखे मला
छान...
भूषण कटककर
बुध, 27/08/2008 - 01:02
Permalink
धन्यवाद
धन्यवाद.
आपल्याबद्द्ल मला आदर वाटतो.
दोजख हा शब्द वापरताना मला असे वाटले की जर गझल उर्दुच आहे तर ते शब्द वापरायला काय हरकत? पण आपली सुचना पाळण्याचा प्रयत्न करेन.
माझ्या गझलेमधे लोक दोष काढत बसले होते. मला सुखापासून वंचित करत. त्याबद्दल आहे.
परत एकदा धन्यवाद.
विश्वस्त
गुरु, 28/08/2008 - 15:04
Permalink
एकदा वृत्त तपासावे
एकदा वृत्त तपासावे. वृत्तात नसलेल्या गझला विचाराधीन करण्यात येतात.
अजय अनंत जोशी
शुक्र, 29/08/2008 - 13:43
Permalink
एकदा वृत्त तपासावे.
एकदा वृत्त तपासावे. वृत्तात नसलेल्या गझला विचाराधीन करण्यात येतात.
हे म्हणणे एकदम मान्य.
माफी असावी हुजूर. पण वॄत्तात बसणा-या गझला इतर कारणांसाठी काढू नयेत. काव्य हे काव्यच असते. ते तितक्याच तटस्थतेने पहावे अशी माझी विनंती आहे. कुणाचे नाव त्या काव्यात घेऊन टीका असलेल्या काव्याचा मीही निषेध करतो.