राहुदे मजला कवी

सांग का त्रासून जावे 'भूमिका बदला नवी'
सांग का माणूस व्हावे राहुदे मजला कवी


त्यात ना कंजूष कोणी की कुणी गमजा करी
जात ना लावूस राहो मोकळा उडता कवी


राग ना ना डूख धारे की न तो हेवा करी
लागता त्या भूक चाखे कीमती दु:खा कवी


सारखा पाउस आहे की जळे काया भली
तारका शोधुन आणे नी रचे गझला कवी

वाट ना पाहुस बोले जी कधी खुद यायची
फार ना मायुस होता सांधतो कविता कवी


 


 


 



 

गझल: 

प्रतिसाद

मान्यवर मित्रांनो,
मला पूर्णपणे मान्य आहे की माझ्या कविता तितक्याशा दर्जेदार नाहीत.
कॄपया मार्गदर्शन चालू ठेवावेत ही विनंती.
 

अलामत ठेवा सलामत ..
इतकेच सांगणे भाऊ.