रंग नभाचे...

तुझ्यावाचुनी सखये... विरले रंग नभाचे
तुला शोधता... कुठे हरवले रंग नभाचे


तुझ्याविना एकाकी भिजणे जमले नाही
चिंब-चिंब... होवुनही हरले रंग नभाचे


शांत..  इथे मी, उदास.. तू आहेस तिथे
दोन तिरावर... रुसून बसले रंग नभाचे


किती तुझ्या अन् माझ्यामधले अंतर हे
निरोप नाही... कुठे हरपले रंग नभाचे


मनासारखी स्वप्ने, मी ही सजवित होतो
श्रावण फुलला पण विस्कटले रंग नभाचे


तुझ्या मनीचे माझ्या ह्रदयी साचत आहे
ओल्या-ओल्या नयनी वसले रंग नभाचे


विरहाचे हे मळभ अताशा... दूर जाहले
भेट तुझी होताच... बिलगले रंग नभाचे


निरभ्र आकाशी बघ... आले इंद्रधनू हे
तू हसलिस अन गाली खुलले रंग नभाचे


प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे


- जनार्दन केशव म्हात्रे
२/ खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५.  भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे

चांगला शेर...!

खूपच छान..
गझलमधले सगळे रंग आवडले..

निरभ्र आकाशी बघ, आले इंद्रधनू हे
तू हसलिस अन गाली खुलले रंग नभाचे
वा.. क्या बात है

निरभ्र आकाशी बघ, आले इंद्रधनू हे
तू हसलिस अन गाली खुलले रंग नभाचे

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे

असेच रंग मिसळत रहा.....

मनासारखी स्वप्ने, मी ही सजवित होतो
श्रावण फुलला पण विस्कटले रंग नभाचे

वा... मस्तच...

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे

सार्थक झाले...

खुपच छान

निरभ्र आकाशी बघ, आले इंद्रधनू हे
तू हसलिस अन गाली खुलले रंग नभाचे


प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे

 

 

क्या बात है . अप्रतिम,
प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे
हा शेर तर एकदम मस्त.

जनू   गझल आवड्ली- बापू दासरी

किती तुझ्या अन् माझ्यामधले अंतर हे
निरोप नाही... कुठे हरपले रंग नभाचे

कुठे आहेस ?

व्वा....छान...


प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे
छान शेर  आहे.थकला ऐवजी सरला  जास्त बरे वाटले असतेका? कारण  थकला  यामुळे नकारात्मक अर्थ  निघतो.असो,शेवटी हे माझे  वैयक्तिक मत  आहे.

तिच्या भेटण्यामुळे प्रवास सार्थकी लागला आहे.. त्यायोगे थकवा आपसुकच गेला आहे. आपण सुचविलेला 'सरला' हा शब्द अधिक संयुक्तिक आहे. परंतू शेरातील थकवा तिच्या भेटीपुर्वीचा आहे.
धन्यवाद..

 

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले
खोल तुझ्या डोळ्यात गवसले रंग नभाचे
 
RANG  NABHACHE  NAHIT  TAR  TE   PRTYEKACHYA   MANACHE   AAHET.
SHEVATCHYA   DON   OLIMADHUN     

प्रवास थकला, शोध संपला, सार्थक झाले     ASE   VATATE......ATI   SUNDAR....

GAJAL FAR SUNDAR VATALI.