आई मिळावी लागते

आई मिळावी लागते

वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते
होत जखमी वाट कवितेची मळावी लागते
 

देव का निर्जीव मूर्ती राहतो सांगा बरे
जन्म घेण्याला इथे आई मिळावी लागते


प्रेम नुसते शपथ घेता पूर्ण होते का कुठे
प्रेयसीची बेवफाई फळफळावी लागते


फक्त गुणवत्तेमुळे ना पाझरे दुनिया कधी
अस्मिता लाचार होउन भळभळावी लागते


तू दिशा जाणून वळण्याचा न काही फायदा
वाट ज्यावर चालशी तू ती वळावी लागते


भूषण कटककर
९३७१० ८०३८७

[
ह्या संकेतस्थळावर मजकूर लिहिताना युनिकोडचाच वापर करावा.   अन्यथा सगळ्यांना मजकूर नीट दिसणार नाही किंवा वाचता येणार नाही.  कृपया इतर कुठल्याही फाँटचा (शिवाजी १,२ वगैरे) वापर करू नये, ही विनंती. टंकलेखनासाठी इथल्याच लेखनसुविधेचा वापर केल्यास ही समस्या येणार नाही.

ह्या गझलेतल्या काही द्विपदी/शेर नीट वाचता न आल्यामुळे युनिकोडमध्ये रुपांतरित केलेले नाहीत.


--विश्वस्त

]

गझल: 

प्रतिसाद

वेदनेच्या आतली सुविधा कळावी लागते...

अस्मिता लाचार होउन भळभळावी लागते...

व्वा

३ शेर नस्ता तरी चालले अस्ते असे मला वाटते...

शुभेच्छा