...ते तसे नव्हतेच, पण...





ते तसे नव्हतेच ,पण मी ते तपासुन पाहिले,
मी तुझ्यामाझ्यातले नाते तपासुन पाहिले...


रात्र अर्धी लोटली की , सोडुनी मज एकला,
नेमके, मन कुठवरी जाते ?  तपासुन पाहिले...


त्या तिच्या नजरेत होते जीवनाचे गीत, ते
ती मुकी मुलगी कशी गाते ? तपासुन पाहिले...


जाणिले, जे भोगले , का भोगले ? माझेच मी
काल गतजन्मातले खाते तपासुन पाहिले...


रोज ती हप्त्यात मेली , पण तरी जगली कशी ?
कोणते हे जहर ती खाते ?  तपासुन पाहिले...


...शैलेश कुलकर्णी





गझल: 

प्रतिसाद

त्या तिच्या नजरेत होते जीवनाचे गीत, ते
ती मुकी मुलगी कशी गाते ? तपासुन पाहिले...

जाणिले, जे भोगले , का भोगले ? माझेच मी
काल गतजन्मातले खाते तपासुन पाहिले...

वावा! छान!
- चक्रपाणि जीवन चिटणीस

मतला आणि जहर हे शेर आवडले!

शैलेशजी,
तुमची ही गजलही आवडली.
रात्र अर्धी लोटली की , सोडुनी मज एकला,
नेमके, मन कुठवरी जाते ?  तपासुन पाहिले...

त्या तिच्या नजरेत होते जीवनाचे गीत, ते
ती मुकी मुलगी कशी गाते ? तपासुन पाहिले...

हे दोन्ही शेर खूपच छान!

सतीश

चांगली गझल...
नेमके, मन कुठवरी जाते ?  तपासुन पाहिले...

अप्रतिम मिसरा आहे..हा मिसरा आणखी दूरवर जाऊ शकतो, असेही वाट्ले....आपल्या इतर गझला देखील आवडल्या.हार्दिक स्वागत !!

तुमच्या गझलेचे  वेगळेपण जाणवतेय...