...जन्माचे आवर्तन सात...

...गझल...


दाद मिळाली ज्या भावात ,
विकत घेतली हातोहात !


चुका सातशे करण्याला ,
जन्माचे आवर्तन सात !


छोटे वय मोठ्यास म्हणे,
"हात ! हारे ! हातरे ! हात !"


पणतीच्या व्यासंगाला
वातीच्या देहाचा घात !


भिंतीला जाणीव हवी
वार्‍याचा पुरतो आघात!


तुझे नियंत्रण मरणावर ,
जगणे तर माझ्या हातात ! 


...शॅलेश कुलकर्णी


 


 

गझल: 

प्रतिसाद

शेवटचे २ शेर आवडले!!
पणती आणि वय हे शेर मात्र कळले नाहीत.

भिंतीला जाणीव हवी
वार्‍याचा पुरतो आघात!.. मस्त

तुझे नियंत्रण मरणावर ,
जगणे तर माझ्या हातात ! .. वा वा
-मानस६

तुझे नियंत्रण मरणावर ,
जगणे तर माझ्या हातात !
वा! वा!
भिंतीचा शेरही छान आहे.

भिंतीला जाणीव हवी
वार्‍याचा पुरतो आघात!