स्वप्न

भेटण्याची काय पण ही रीत आहे?
टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे


गांजलेल्या माणसांच्या स्वागताला
झोपडी माझी उभ्या वस्तीत आहे


राहिल्या आता न चिंता कोणत्याही
मी दिवाळे काढुनी नि:श्चिंत आहे


आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे


ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे


           ----धोंडोपंत आपटे

गझल: 

प्रतिसाद

भेटण्याची काय पण ही रीत आहे?
टाळुनी म्हणतेस वरती प्रीत आहे
सुंदर..

आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे

 छान...छान...
ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे

वा...वा...
वा...धोंडोपंत, वा...
नीटनेटकी, वृत्तबद्ध रचना :)
आवडली  गझल...येऊ द्या आणखी. शुभेच्छा.
 

सुंदर गझल.
आवडली.

खूपच छान, काळजाला हात घातलात.
 
सुनिल देशमुख.

वाह! क्या बात है पंत. खुपच सुंदर.

आठवण गेली तुझी देऊन झोका
मी पुन्हा आता गडे मस्तीत आहे


ये भविष्याचे पुन्हा चल स्वप्न पाहू
कालचा इतिहास त्या रद्दीत आहे.. हे दोन्ही शेर अतिशय आवडले
-मानस६

हा शेर फार सुंदर पंत!
 

इतिहास हा शेर फार आवडला पंत!!