आपणांस काय वाटते?

ह्या संकेतस्थळाबद्दल आपले मत आणि ह्या संकेतस्थळाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा येथे मांडाव्यात. बदल आणि सुधारणा करताना अमूल्य मदत होईल.

'नवा प्रतिसाद द्या' ह्या दुव्यावर टिचकी द्या आणि आपला प्रतिसाद द्या. प्रतिसाद देताना किंवा लिखाण करताना अडचण येत असल्यास csbhat@gmail.com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. आपण वापरत असलेली ऑपरेटिंग सिस्टिम आणि अडचणीचे नेमके स्वरूप कळवावे.


प्रतिसाद

आहा, विन्९८मधून लिहिता येते तर!
खूप आनंद झाला...
तुमची  आपली  कर्तव्यपरायणता  आणि तत्परता वाखाणण्याजोगी  आहे.
विश्वस्तांना धन्यवाद!

संकेतस्थळ अतिशय उत्तम आहे. खरं तर सुरेशभटांवर संकेतस्थळ सुरू करण्याची कल्पना आवडली.
आता येथे येऊन वाचत रहावे आणि मजेत जगावे असे होईल. जे गझलकार आहेत त्यांच्यासाठी तर ही पर्वणी आहेच, पण माझ्या सारखे जे फक्त वाचक आहेत त्यांच्यासाठी सुध्दा ही अतिशय महत्वाची जागा आहे. येथे अनेक जाणकार आहेत.
हे संकेतस्थळ उत्तरोत्तर प्रगती करो ही शुभेच्छा.
नीलकांत

येथे टंकित केलेला सारा मजकूर हवा होतो. मग पुन:श्च् हरि ओम्!
(ओम् कसा लिहितात ते पाहण्याचे धाडस नाही.) 
कळफलकाची माहिती नवीन पानावर न देता, (जावास्क्रिप्ट् ने) नवीन गवाक्षात दिली तर बरे होईल.

तुम्ही म्हणता तसे करता येईल. पण लिहून लिहून कळफलकाची सवय होते, असा अनुभव आहे.

चुकून सापडले. आनंद झाला.

Hello...
Instead of changing language from list box, it would be easier to change it using a single keyvorad key... So please provide that facility.
Nachiket

शॉर्टकट की देऊन लिपी बदलण्याची सोय तयार  आहे. ह्याशिवायही अनेक बदल करायचे
आहेत. पण त्यासाठी संकेतस्थळ थोडा वेळ बंद (अंडर मेंटेनन्स)  ठेवावे लागेल.  ह्या
रविवारपर्यंत ही सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. 




आद्य मराठी गझलकार कवी सुरेश भटांची  मुलाखत व राम शेवाळकरांचा लेख दोन्ही खूप आवडले.
(संवाद भाग५ मध्ये कांही मुद्रितशोधीते-
१.एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
२. माधवराव गझलेला 'भावगीत' सम
असो.)
भट्साहेबांनी लिहिलेल्या कवितासंग्रहांच्या प्रस्तावना येथे दिल्यात तर उत्तम.

हे संकेतस्थळ खूप आवडले. 

दुरुस्ती केली आहे.

मी आत्ताच "आलाप" ही गझल "भटांच्या कविता" ह्या विभागात पाठवली आहे. पण मला दोन ओळींमधले अंतर control करता येत नाहीये. काही settings मधे बदल करावा लागतो का? मी windows XP आणि Internet Explorer 6.0 वापरतो.
धन्यवाद!!

शिफ्ट + एंटर एकत्र दाबून
हे अंतर नियंत्रित करता येईल.

जिथे ओळ संपवायची असेल तिथे शिफ्ट + एंटर एकत्र दाबून
पुढच्या ओळीवर जावे.




प्रतिसाद वाचण्यासाठी आधी असलेली Preferences सेव करून ठेवण्याची सुविधा चांगली होती. आता एक प्रतिसादच एका वेळी उघडतो. तो वाचून झाल्यावर मूळ पानावर परत जाऊन मग पुढच्या प्रतिसादाच्या दुव्यावर टिचकी मारावी लागते. एकाद्या गझलेस अनेक प्रतिसाद असले तर वाचण्यास बरेचदा मागेपुढे करावे लागते.

पूर्वी प्रमाणे प्रतिसाद विस्ताराने पाहिजेत की संक्षेपाने ते वाचकांना ठरवू दिले तर बरे होईल.

प्रतिसादाखाली डाव्या कोपर्‍यात असलेल्या मागे जा ह्या दुव्यावर टिचकी देऊन आपण मागे सहज जाऊ शकता.
बदल केले आहेत. यावर काम चालू आहे.
 
 

स्वतः लिहिलेल्या मजकुरात बदल करण्याची सोय काही विविक्षित कारणास्तव काढून टाकलेली दिसते.
ती सोय तशीच ठेऊन 'आद्ययावत' आणि 'नवीन' मजकुराची क्रमवारी योग्य प्रकारे करता येते का आणि 'आद्ययावत' मजकुरास अग्रक्रम मिळणार नाही असे करता येईल का ते पहावे अशी नम्र विनंती.
 

प्रिय भटसाहेब
साइट मस्तच  चालली आहे. ताजे लेख मस्त. काही गझला कच्च्या आहेत. पण त्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही. मी फक्त इतके म्हणेन की अश्याना बाजुला काढा. इथे तंत्रशुध्द रचनाच द्या.
 

लिहिलेल्या / पोस्ट केलेल्या गझलेत कालांतराने काही बदल करावयाचे झाल्यास ते कसे करावेत?? इथे 'बदल' किंवा 'Edit' असे काही दिसत नाही. ही सुविधा देता येईल काय? उपलब्ध असल्यास कृपया लिंक बाबत
मार्गदर्शन करावे.
-आभाळ :)

जे बदल करायचे आहेत ते विश्वस्तांना निरोपाने किंवा तिथेच कळवावेत. आपणांस हवे ते बदल करण्यात येतील.

कृपया हे "मागे जा" वैगेरे टाळून सहज सगळे प्रतिसाद एकत्र किंवा सलग एकाखाली एक बघण्यासाठी काही करता येईल का?

सदस्य आपल्या सोयीनुसार प्रतिसाद बघण्याचे पर्याय निवडू/बदलू शकतात.

  1. Flat list collapsed
  2. Flat list expanded
  3. Threaded list collapsed
  4. Threaded list expanded

हे चार पर्याय ड्रूपलने उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील हवा तो पर्याय निवडावा.

शैलु गुरव
काहि वेळेस येण्याची नोन्द करताना मराठी फोन्ट येतच नाही तर तेव्हा काय करावे.

काहि वेळेस येण्याची नोन्द करताना मराठी फोन्ट येतच नाही तर तेव्हा काय करावे.
ब्राउजर आणि ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल माहिती द्यावी. अडचणीबद्दल थोडे अधिक सविस्तरपणे सांगितल्यास उत्तम

शैलु गुरव
ओपेरा ब्राउजर आणि एक्स्पि ऑपेरटिगं सिस्टीम आहे.

छान संकेत स्थळ पहायला मिळाले. गझल आणि सुरेश भट या जोडीच्या प्रकाराला वाहिलेल्या संकेत स्थळाच्या निर्मिती साठी सर्व संबधितांचे अभिनंदन !

माझ्या  कॉर्‍म्पूटरवर  मराठी फॉन्ट आहे. पण तरी देखील  मराठीतून ई-मेल  पाठवता येत नाही.   पण  हा प्रतिसाद पाठवताना माझ्या कॉम्पूटवर असलेला  मराठी फॉन्ट वापरु शकतो याचे मला फार नवल वाटते. आपण काय जादु केली  आहे  याचा खुलासा आपण केला तर फार बरे होईल.

'आजचा शेर' ब-याच दिवसांपासून तोच आहे... :-)
-नितीन

tuza upkram baghun anand zala ... aaj sakal madhye tuzi news wachali ...

मी  या प्रकारच्या सेवेचे अभिनन्दन करतो  परमनन्द.
 
 

प्रिय भटसाहेब
मला सहभागी  करुन घेतल्याबद्दल धन्यवाद.
कविवर्य सुरेश भटांच्या सहीने `एल्गार` भेट मिळालेला मी  एक भाग्यवान आहे. सोलापुरात मला ही  भेट मिळाली. यु ट्युब पाहताना हे सकेतस्थळ सापडले. खूप खूप धन्यवाद.

खुप खुप आनन्द झाला...
नविन सन्केत स्थल सुरु करुन आपन सुरेश भटा ना जि श्रधान्जलि वाहिलि आहे त्यला मझे कोटि कोटी प्रणाम! ंमाझा हि त्यत खारिचा वाटा राखन्याचा मी प्रयात्न करिन.
आभार आनि शुभेछ्या....
श्रीजित वाघमारे

हे खरच खुपच दुर्मिळ असे सन्केत स्थळ आहे.............
भटान्च्या  दुर्मिळ गझल तसेच कविता  उपलब्ध केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!       
-अबोलि
                                                             

मला स द्स्य व्हाय् चे  आहे.काय क रा व?

काही संदर्भासाठी मायबोली ही कविता तातडीने हवी होती. रूपगंधा हाताशी नव्ह्ते. "भटांच्या कविता" या ठिकाणी ही कविता "मराठी" या नावाने मिळाली. त्यात टंकलेखनाच्या काही चूका आहेत. त्या कृपया दुरुस्त कराव्यात ही विनंती. चुकीचे शब्द लाल रंगात. रुपगंधानुसार योग्य शब्द हिरव्या रंगात...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी  (अम्हास)
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी     (धन्य ऐकतो)
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

१.आमुच्या मनामानात दंग ते मराठी  (मनामनात दंगते)
२.आमुच्या रगरगात रंगते मराठी (रगारगात)
३.आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी  (उराउरात स्पंदते)
४.आमुच्या नसानसात नाच ते मराठी  (नाचते)
(रुपगंधातील कवितेत या ओळी  १,३,४,२ या क्रमाने आहेत)
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुला कुलात नांदते मराठी  (कुलाकुलात)
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी  (दाटते)
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

हे तुझे अश वेळी  लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही 
ह्या गझलेचे सगळे शब्द मला कोणी देवु शकेल का ?

उत्त् म   चित्तु
..... लगे रहो........
 
निखिल

उत्तम वेबसाईट ! भटांच्या प्रतिभेला शोभेल असा उपक्रम.
शतशः धन्यवाद आणि शुभेच्छा !
-धीरज

एखादी कविता अथवा गाणे निवडायचे असेल तर शोध ही सुविधा असायला हवी. 

नमस्कार,
 
मी कविवर्य भटांच्या कविता ह्या संकेतस्थळावर  पाठवू शकतो का?
जेणेकरुन आपला भटांच्या कवितांचा संग्रह वाढविता येईल.
धन्यवाद

I want to write in Marathi. because marathi Gazal is my love. I was write Marathi Gazals with Suresh Bhat .

मला गझल लिहायला आवडते. मी कै. सुरेश भट यान्च्या बरोबर गझल लेखन केले आहे. आता पुन्हा सुरूवात करायची इछा आहे. आपण सुरू केलेला उपक्रम मला फार आवडला. यात भाग घ्यायला मला आवडेल. तरी मला आपल्या उपक्रमात सहभागी करून घ्यावे ही विनन्ती.

नीता आम्बेगावकर

नमस्कार विश्वस्त !

आपण मला आपल्या संकेतस्थळावर सामावून घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

नमस्कार विश्वस्त!

मी एक गझल या वेब साईट्वर लिहिली आहे. पण आता दुसरी लिहिताना दोन वेळा नुसते गझलचे नावच सबमिट झाले आहे. गझल नोंदली गेलीच नाही. तरी आता मला काय करावे लागेल? शिवाय नुसते नोंदले गेलेले नाव डिलिट कसे करता येईल? कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती.

नीता आंबेगावकर

मुखपृष्ठावर गझलेबरोबरच गझलकाराचे नावही  दिसले तर बरे होईल...
गझलेच्या नावावरून वाचक सहसा गझल लक्षात ठेवत नाही (हे माझे मत). मी आत्ताच एकच गझल तीन वेळा उघडली..
मुखपृष्ठावरील बाकिचे बदल आवडले...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!

नम्स्कार,
१.
मी ह्या वेब साईट वर चार गझल पाठव्ल्या आहेत्.आपल्या कडून काही प्रतिसाद नाही. गझल मिळाल्या आहेत कि नाही ह्याची उत्कंठा आहे म्हणून हा निरोप्.उत्तरा ची अपेक्षा आहे.
२.
मराठी टाईप करताना प्रत्येक अक्षरा नंतर बराच वेळ द्यावा लागतो. हि क्षती दूर व्हावी.
`khalish' -Ahmedabad - 18-06-2009./18.10.hrs.

हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्याबद्द्ल सर्वप्रथम अभिनंदन !
या संकेतस्थळावर गझले बरोबर कवितांचाही समावेश केल्यास अधिक परिपूर्ण होईल.
मी स्वतः येथे ३ कविता (मन्मना, जाग, वेदना) आणि १ गझल (ओळख) पाठविल्या आहेत.
त्यासंदर्भात योग्य  त्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
नवीन काव्यप्रेमी असल्याने मार्गदर्शनासाठी  ते उपयुक्त ठरतील.
धन्यवाद !
नचिकेत भिंगार्डे

असाच कधी बसलो होतो आसव गालित मी
विरहात तुझ्या प्रिये होतो एकान्त जालित मी

कले न मज कसे असावे जिवन तुज वाचुनि
वालु मद्ये स्वप्नान्चे होतो चित्र उतारित मी

वाहुन गेले चित्र जरी राहिलो मी बाकी
कालाच्या लहरी सोबत क धावित नव्हतो मी

असेन मी ही खुला कदाचित समजुन हि उमजेना
जीवनात माझ्या महत्व तुझे जानित होतो मी

नमस्कार,
अपग्रेडेशन चांगले झाले आहे.
पण ह्या पूर्वी पाठवलेल्या कॄती आपोआप सेव होऊन लगेच लीस्ट वर दिसायच्या.आता तसे होत नाही.जर कृती अस्वीकृत झाल्या तर त्या पाठवण्या आधी कट पेस्ट करून आपल्या कोम्प्युटर वर सेव केल्या नसल्या तर ते लेखन न केल्यातच जमा व्हायची शक्यता नाकारता येत नाही. तसे असल्यास ,ही तृटी दूर करावी.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १२-०८-२००९.

अतिशय उत्तम स्थळ ! हे स्थळ उत्तम करणारे विश्वस्त आणि गझलकार या सर्वांचे हार्दिक आभार !

आजकाल कुठल्याही कवीच्या नावावर क्लिक केले की त्याचा इतिहास दिसतच नाही.

पूर्वी असे क्लिक केले की त्या कवीने आणखी काय केले आहे मागे हे दिसायचे....

आता पानं शोधत बसावी लागतात.....

कवीच्या नावावर क्लिक केले की त्याच्या सर्व रचना एकाच पानावर दिसायची सोय पुन्हा कएली तर बरे होईल....!

आम्हा सामान्य रसिकांसाठी हे स्थळ अतिशय मोलाचे आहे.....मनापासून शुभेच्छा !

धन्यवाद !

Pages