आपणांस काय वाटते?
ह्या संकेतस्थळाबद्दल आपले मत आणि ह्या संकेतस्थळाकडून आपल्याला असलेल्या अपेक्षा येथे मांडाव्यात. बदल आणि सुधारणा करताना अमूल्य मदत होईल.
'नवा प्रतिसाद द्या' ह्या दुव्यावर टिचकी द्या आणि आपला प्रतिसाद द्या. प्रतिसाद देताना किंवा लिखाण करताना अडचण येत असल्यास csbhat@gmail.com ह्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. आपण वापरत असलेली ऑपरेटिंग सिस्टिम आणि अडचणीचे नेमके स्वरूप कळवावे.
प्रतिसाद
विसुनाना
मंगळ, 17/04/2007 - 18:45
Permalink
अरे वा! झाले की ठीक!
आहा, विन्९८मधून लिहिता येते तर!
खूप आनंद झाला...
तुमची आपली कर्तव्यपरायणता आणि तत्परता वाखाणण्याजोगी आहे.
विश्वस्तांना धन्यवाद!
नीलकांत
मंगळ, 17/04/2007 - 18:52
Permalink
अश्या संकेतस्थळाबद्दल धन्यवद.
संकेतस्थळ अतिशय उत्तम आहे. खरं तर सुरेशभटांवर संकेतस्थळ सुरू करण्याची कल्पना आवडली.
आता येथे येऊन वाचत रहावे आणि मजेत जगावे असे होईल. जे गझलकार आहेत त्यांच्यासाठी तर ही पर्वणी आहेच, पण माझ्या सारखे जे फक्त वाचक आहेत त्यांच्यासाठी सुध्दा ही अतिशय महत्वाची जागा आहे. येथे अनेक जाणकार आहेत.
हे संकेतस्थळ उत्तरोत्तर प्रगती करो ही शुभेच्छा.
नीलकांत
विसुनाना
बुध, 18/04/2007 - 09:29
Permalink
कळफलकाची माहिती छातीत कळ आणते.
येथे टंकित केलेला सारा मजकूर हवा होतो. मग पुन:श्च् हरि ओम्!
(ओम् कसा लिहितात ते पाहण्याचे धाडस नाही.)
कळफलकाची माहिती नवीन पानावर न देता, (जावास्क्रिप्ट् ने) नवीन गवाक्षात दिली तर बरे होईल.
विश्वस्त
बुध, 18/04/2007 - 11:26
Permalink
करता येईल
तुम्ही म्हणता तसे करता येईल. पण लिहून लिहून कळफलकाची सवय होते, असा अनुभव आहे.
विसुनाना
बुध, 18/04/2007 - 17:57
Permalink
"www.sureshbhat.com"!!! उत्तम!
चुकून सापडले. आनंद झाला.
आनंदयात्री
बुध, 18/04/2007 - 18:26
Permalink
Switching between languages
Hello...
Instead of changing language from list box, it would be easier to change it using a single keyvorad key... So please provide that facility.
Nachiket
विश्वस्त
बुध, 18/04/2007 - 20:42
Permalink
सोय तयार आहे पण
शॉर्टकट की देऊन लिपी बदलण्याची सोय तयार आहे. ह्याशिवायही अनेक बदल करायचे
आहेत. पण त्यासाठी संकेतस्थळ थोडा वेळ बंद (अंडर मेंटेनन्स) ठेवावे लागेल. ह्या
रविवारपर्यंत ही सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.
विसुनाना
शनि, 21/04/2007 - 16:21
Permalink
दुर्मीळ मुलाखत आणि लेख
आद्य मराठी गझलकार कवी सुरेश भटांची मुलाखत व राम शेवाळकरांचा लेख दोन्ही खूप आवडले.
(संवाद भाग५ मध्ये कांही मुद्रितशोधीते-
१.एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही
२. माधवराव गझलेला 'भावगीत' समजत
असो.)
भट्साहेबांनी लिहिलेल्या कवितासंग्रहांच्या प्रस्तावना येथे दिल्यात तर उत्तम.
प्रणव सदाशिव काळे
सोम, 23/04/2007 - 09:23
Permalink
मुखपृष्ठाला जायची सोय
हे संकेतस्थळ खूप आवडले.
गझलेची बाराखडी भटांच्या कविता नवे लेख नव्या गझला अभिप्राय ही यादी कोठूनही दिसते. म्हणजे एखादी गझल वाचत असतानाही दिसते. ह्या यादीत मुखपृष्ठाला जायची सोयही देता येईल का?
विश्वस्त
सोम, 23/04/2007 - 11:18
Permalink
दुरुस्ती केली आहे.
दुरुस्ती केली आहे.
नचिकेत
बुध, 25/04/2007 - 12:19
Permalink
line spacing....
मी आत्ताच "आलाप" ही गझल "भटांच्या कविता" ह्या विभागात पाठवली आहे. पण मला दोन ओळींमधले अंतर control करता येत नाहीये. काही settings मधे बदल करावा लागतो का? मी windows XP आणि Internet Explorer 6.0 वापरतो.
धन्यवाद!!
विश्वस्त
बुध, 25/04/2007 - 13:11
Permalink
शिफ्ट + एंटर एकत्र
शिफ्ट + एंटर एकत्र दाबून
हे अंतर नियंत्रित करता येईल.
जिथे ओळ संपवायची असेल तिथे शिफ्ट + एंटर एकत्र दाबून
पुढच्या ओळीवर जावे.
मिलिंद फणसे
गुरु, 26/04/2007 - 06:26
Permalink
प्रतिसाद वाचण्याची सोय
प्रतिसाद वाचण्यासाठी आधी असलेली Preferences सेव करून ठेवण्याची सुविधा चांगली होती. आता एक प्रतिसादच एका वेळी उघडतो. तो वाचून झाल्यावर मूळ पानावर परत जाऊन मग पुढच्या प्रतिसादाच्या दुव्यावर टिचकी मारावी लागते. एकाद्या गझलेस अनेक प्रतिसाद असले तर वाचण्यास बरेचदा मागेपुढे करावे लागते.
विसुनाना
गुरु, 26/04/2007 - 12:22
Permalink
मलाही हेच वाटते
पूर्वी प्रमाणे प्रतिसाद विस्ताराने पाहिजेत की संक्षेपाने ते वाचकांना ठरवू दिले तर बरे होईल.
विश्वस्त
गुरु, 26/04/2007 - 16:28
Permalink
मागे जा ह्या दुव्यावर टिचकी द्या
प्रतिसादाखाली डाव्या कोपर्यात असलेल्या मागे जा ह्या दुव्यावर टिचकी देऊन आपण मागे सहज जाऊ शकता.
बदल केले आहेत. यावर काम चालू आहे.
विसुनाना
शुक्र, 27/04/2007 - 22:49
Permalink
बदल करण्याची सोय
स्वतः लिहिलेल्या मजकुरात बदल करण्याची सोय काही विविक्षित कारणास्तव काढून टाकलेली दिसते.
ती सोय तशीच ठेऊन 'आद्ययावत' आणि 'नवीन' मजकुराची क्रमवारी योग्य प्रकारे करता येते का आणि 'आद्ययावत' मजकुरास अग्रक्रम मिळणार नाही असे करता येईल का ते पहावे अशी नम्र विनंती.
राजदूत
मंगळ, 01/05/2007 - 17:04
Permalink
ताज्या गझला
प्रिय भटसाहेब
साइट मस्तच चालली आहे. ताजे लेख मस्त. काही गझला कच्च्या आहेत. पण त्यावर बोलण्याची माझी पात्रता नाही. मी फक्त इतके म्हणेन की अश्याना बाजुला काढा. इथे तंत्रशुध्द रचनाच द्या.
आभाळ
गुरु, 17/05/2007 - 10:49
Permalink
बदल कसा करावा??
लिहिलेल्या / पोस्ट केलेल्या गझलेत कालांतराने काही बदल करावयाचे झाल्यास ते कसे करावेत?? इथे 'बदल' किंवा 'Edit' असे काही दिसत नाही. ही सुविधा देता येईल काय? उपलब्ध असल्यास कृपया लिंक बाबत
मार्गदर्शन करावे.
-आभाळ :)
विश्वस्त
गुरु, 17/05/2007 - 14:42
Permalink
जे बदल करायचे आहेत
जे बदल करायचे आहेत ते विश्वस्तांना निरोपाने किंवा तिथेच कळवावेत. आपणांस हवे ते बदल करण्यात येतील.
साती
गुरु, 17/05/2007 - 17:29
Permalink
असेच!
कृपया हे "मागे जा" वैगेरे टाळून सहज सगळे प्रतिसाद एकत्र किंवा सलग एकाखाली एक बघण्यासाठी काही करता येईल का?
विश्वस्त
गुरु, 17/05/2007 - 18:17
Permalink
प्रतिसाद बघण्याचे पर्याय
सदस्य आपल्या सोयीनुसार प्रतिसाद बघण्याचे पर्याय निवडू/बदलू शकतात.
हे चार पर्याय ड्रूपलने उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील हवा तो पर्याय निवडावा.
शैलेंद्र गुरव
शुक्र, 22/06/2007 - 12:09
Permalink
अडचन
शैलु गुरव
काहि वेळेस येण्याची नोन्द करताना मराठी फोन्ट येतच नाही तर तेव्हा काय करावे.
विश्वस्त
शुक्र, 22/06/2007 - 19:03
Permalink
अधिक माहिती
काहि वेळेस येण्याची नोन्द करताना मराठी फोन्ट येतच नाही तर तेव्हा काय करावे.
ब्राउजर आणि ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल माहिती द्यावी. अडचणीबद्दल थोडे अधिक सविस्तरपणे सांगितल्यास उत्तम
शैलेंद्र गुरव
शनि, 23/06/2007 - 12:38
Permalink
अड्चणिबद्दल अधिक माहिती
शैलु गुरव
ओपेरा ब्राउजर आणि एक्स्पि ऑपेरटिगं सिस्टीम आहे.
उन्मेष बागवे (not verified)
शुक्र, 28/09/2007 - 11:48
Permalink
छान संकेत स्थळ
छान संकेत स्थळ पहायला मिळाले. गझल आणि सुरेश भट या जोडीच्या प्रकाराला वाहिलेल्या संकेत स्थळाच्या निर्मिती साठी सर्व संबधितांचे अभिनंदन !
मोहन दड्डीकर (not verified)
शुक्र, 26/10/2007 - 19:59
Permalink
मराठी (देवनागरी) लिपी
माझ्या कॉर्म्पूटरवर मराठी फॉन्ट आहे. पण तरी देखील मराठीतून ई-मेल पाठवता येत नाही. पण हा प्रतिसाद पाठवताना माझ्या कॉम्पूटवर असलेला मराठी फॉन्ट वापरु शकतो याचे मला फार नवल वाटते. आपण काय जादु केली आहे याचा खुलासा आपण केला तर फार बरे होईल.
नितीन
मंगळ, 08/01/2008 - 01:55
Permalink
'आजचा शेर' ब-याच दिवसांपासून तोच आहे...
'आजचा शेर' ब-याच दिवसांपासून तोच आहे... :-)
-नितीन
सतिश गुन्डावार (not verified)
शुक्र, 14/03/2008 - 03:51
Permalink
आन्नद झाला
tuza upkram baghun anand zala ... aaj sakal madhye tuzi news wachali ...
परमनन्द सावलगी (not verified)
शुक्र, 14/03/2008 - 20:57
Permalink
मी या
मी या प्रकारच्या सेवेचे अभिनन्दन करतो परमनन्द.
prasad p kulkarni
शुक्र, 14/03/2008 - 23:15
Permalink
धन्यवाद
प्रिय भटसाहेब
मला सहभागी करुन घेतल्याबद्दल धन्यवाद.
कविवर्य सुरेश भटांच्या सहीने `एल्गार` भेट मिळालेला मी एक भाग्यवान आहे. सोलापुरात मला ही भेट मिळाली. यु ट्युब पाहताना हे सकेतस्थळ सापडले. खूप खूप धन्यवाद.
श्रीजित वाघमारे
सोम, 24/03/2008 - 17:52
Permalink
सन्केत स्थला बद्दाल अभिनन्दन
खुप खुप आनन्द झाला...
नविन सन्केत स्थल सुरु करुन आपन सुरेश भटा ना जि श्रधान्जलि वाहिलि आहे त्यला मझे कोटि कोटी प्रणाम! ंमाझा हि त्यत खारिचा वाटा राखन्याचा मी प्रयात्न करिन.
आभार आनि शुभेछ्या....
श्रीजित वाघमारे
अ (not verified)
गुरु, 03/04/2008 - 15:10
Permalink
खूपच दुर्मिळ असे सन्केत स्थळ
हे खरच खुपच दुर्मिळ असे सन्केत स्थळ आहे.............
भटान्च्या दुर्मिळ गझल तसेच कविता उपलब्ध केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
-अबोलि
हर्शसोलस्कर
बुध, 16/04/2008 - 07:30
Permalink
मला स
मला स द्स्य व्हाय् चे आहे.काय क रा व?
अविनाश ओगले
शुक्र, 18/04/2008 - 17:45
Permalink
मायबोली आणि मराठी...
काही संदर्भासाठी मायबोली ही कविता तातडीने हवी होती. रूपगंधा हाताशी नव्ह्ते. "भटांच्या कविता" या ठिकाणी ही कविता "मराठी" या नावाने मिळाली. त्यात टंकलेखनाच्या काही चूका आहेत. त्या कृपया दुरुस्त कराव्यात ही विनंती. चुकीचे शब्द लाल रंगात. रुपगंधानुसार योग्य शब्द हिरव्या रंगात...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी (अम्हास)
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी (धन्य ऐकतो)
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
१.आमुच्या मनामानात दंग ते मराठी (मनामनात दंगते)
२.आमुच्या रगरगात रंगते मराठी (रगारगात)
३.आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी (उराउरात स्पंदते)
४.आमुच्या नसानसात नाच ते मराठी (नाचते)
(रुपगंधातील कवितेत या ओळी १,३,४,२ या क्रमाने आहेत)
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी (कुलाकुलात)
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी (दाटते)
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
रविन्द्र (not verified)
शुक्र, 30/05/2008 - 09:04
Permalink
गझल हवी
हे तुझे अश वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
ह्या गझलेचे सगळे शब्द मला कोणी देवु शकेल का ?
निखिल (not verified)
गुरु, 10/07/2008 - 14:42
Permalink
उत्त् म
उत्त् म चित्तु
..... लगे रहो........
निखिल
धीरज (not verified)
बुध, 16/07/2008 - 15:55
Permalink
उत्तम वेबसाईट
उत्तम वेबसाईट ! भटांच्या प्रतिभेला शोभेल असा उपक्रम.
शतशः धन्यवाद आणि शुभेच्छा !
-धीरज
कलंत्री (not verified)
मंगळ, 21/10/2008 - 21:50
Permalink
शोध ही सुविधा हवी.
एखादी कविता अथवा गाणे निवडायचे असेल तर शोध ही सुविधा असायला हवी.
कलंदर
रवि, 14/12/2008 - 08:34
Permalink
कविवर्य भटांच्या कविता ह्या संकेतस्थळावर पाठविणे बाबत
नमस्कार,
मी कविवर्य भटांच्या कविता ह्या संकेतस्थळावर पाठवू शकतो का?
जेणेकरुन आपला भटांच्या कवितांचा संग्रह वाढविता येईल.
धन्यवाद
kunal gaikwad
सोम, 05/01/2009 - 16:20
Permalink
(No subject)
नीता
शनि, 18/04/2009 - 13:56
Permalink
मराठी गझलेबद्दल
I want to write in Marathi. because marathi Gazal is my love. I was write Marathi Gazals with Suresh Bhat .
नीता
बुध, 22/04/2009 - 13:04
Permalink
गझले बद्दल
मला गझल लिहायला आवडते. मी कै. सुरेश भट यान्च्या बरोबर गझल लेखन केले आहे. आता पुन्हा सुरूवात करायची इछा आहे. आपण सुरू केलेला उपक्रम मला फार आवडला. यात भाग घ्यायला मला आवडेल. तरी मला आपल्या उपक्रमात सहभागी करून घ्यावे ही विनन्ती.
नीता आम्बेगावकर
नीता
शनि, 25/04/2009 - 20:26
Permalink
धन्यवाद
नमस्कार विश्वस्त !
आपण मला आपल्या संकेतस्थळावर सामावून घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
नीता
बुध, 29/04/2009 - 10:50
Permalink
लिहिताना प्रॉब्लेम येत आहे.
नमस्कार विश्वस्त!
मी एक गझल या वेब साईट्वर लिहिली आहे. पण आता दुसरी लिहिताना दोन वेळा नुसते गझलचे नावच सबमिट झाले आहे. गझल नोंदली गेलीच नाही. तरी आता मला काय करावे लागेल? शिवाय नुसते नोंदले गेलेले नाव डिलिट कसे करता येईल? कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती.
नीता आंबेगावकर
आनंदयात्री
शुक्र, 22/05/2009 - 11:27
Permalink
मुखपृष्ठा
मुखपृष्ठावर गझलेबरोबरच गझलकाराचे नावही दिसले तर बरे होईल...
गझलेच्या नावावरून वाचक सहसा गझल लक्षात ठेवत नाही (हे माझे मत). मी आत्ताच एकच गझल तीन वेळा उघडली..
मुखपृष्ठावरील बाकिचे बदल आवडले...
चुभूद्याघ्या...
***********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!!
खलिश
गुरु, 18/06/2009 - 18:11
Permalink
पाठवलेल्या ४ गझली बद्द्ल.......
नम्स्कार,
१.
मी ह्या वेब साईट वर चार गझल पाठव्ल्या आहेत्.आपल्या कडून काही प्रतिसाद नाही. गझल मिळाल्या आहेत कि नाही ह्याची उत्कंठा आहे म्हणून हा निरोप्.उत्तरा ची अपेक्षा आहे.
२.
मराठी टाईप करताना प्रत्येक अक्षरा नंतर बराच वेळ द्यावा लागतो. हि क्षती दूर व्हावी.
`khalish' -Ahmedabad - 18-06-2009./18.10.hrs.
काव्यरसिक
शनि, 04/07/2009 - 20:37
Permalink
कवितांचाही समावेश करावा
हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे त्याबद्द्ल सर्वप्रथम अभिनंदन !
या संकेतस्थळावर गझले बरोबर कवितांचाही समावेश केल्यास अधिक परिपूर्ण होईल.
मी स्वतः येथे ३ कविता (मन्मना, जाग, वेदना) आणि १ गझल (ओळख) पाठविल्या आहेत.
त्यासंदर्भात योग्य त्या प्रतिसादाची अपेक्षा आहे.
नवीन काव्यप्रेमी असल्याने मार्गदर्शनासाठी ते उपयुक्त ठरतील.
धन्यवाद !
नचिकेत भिंगार्डे
शगुन
शनि, 25/07/2009 - 10:19
Permalink
असाच कधी
असाच कधी बसलो होतो आसव गालित मी
विरहात तुझ्या प्रिये होतो एकान्त जालित मी
कले न मज कसे असावे जिवन तुज वाचुनि
वालु मद्ये स्वप्नान्चे होतो चित्र उतारित मी
वाहुन गेले चित्र जरी राहिलो मी बाकी
कालाच्या लहरी सोबत क धावित नव्हतो मी
असेन मी ही खुला कदाचित समजुन हि उमजेना
जीवनात माझ्या महत्व तुझे जानित होतो मी
खलिश
बुध, 12/08/2009 - 23:35
Permalink
वेब साइट्च्या अपग्रेडेशन बद्दल
नमस्कार,
अपग्रेडेशन चांगले झाले आहे.
पण ह्या पूर्वी पाठवलेल्या कॄती आपोआप सेव होऊन लगेच लीस्ट वर दिसायच्या.आता तसे होत नाही.जर कृती अस्वीकृत झाल्या तर त्या पाठवण्या आधी कट पेस्ट करून आपल्या कोम्प्युटर वर सेव केल्या नसल्या तर ते लेखन न केल्यातच जमा व्हायची शक्यता नाकारता येत नाही. तसे असल्यास ,ही तृटी दूर करावी.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १२-०८-२००९.
श्रीवत्स
गुरु, 10/09/2009 - 11:45
Permalink
अतिशय उत्तम स्थळ ! हे स्थळ
अतिशय उत्तम स्थळ ! हे स्थळ उत्तम करणारे विश्वस्त आणि गझलकार या सर्वांचे हार्दिक आभार !
आजकाल कुठल्याही कवीच्या नावावर क्लिक केले की त्याचा इतिहास दिसतच नाही.
पूर्वी असे क्लिक केले की त्या कवीने आणखी काय केले आहे मागे हे दिसायचे....
आता पानं शोधत बसावी लागतात.....
कवीच्या नावावर क्लिक केले की त्याच्या सर्व रचना एकाच पानावर दिसायची सोय पुन्हा कएली तर बरे होईल....!
आम्हा सामान्य रसिकांसाठी हे स्थळ अतिशय मोलाचे आहे.....मनापासून शुभेच्छा !
धन्यवाद !
Pages