ए. के. शेख यांची गझल...

घाईमध्ये जीवन सरले... पाहू आता पुढल्या जन्मी
करणे जे ते, सारे उरले... पाहू आता पुढल्या जन्मी


आयुष्यच हे उधळुन दिधले प्रिय सखीवर माझे तरिही
प्रेम सखीला नाही कळले... पाहू आता पुढल्या जन्मी


नोकर-चाकर.. गाडी-माडी.. श्रीमंती.. अधिकार नि सत्ता
स्वप्नं न ते सत्यात उतरले.. पाहू आता पुढल्या जन्मी


कर्जामध्ये जीवन सरले, पुण्य खर्चले... व्याजामध्ये
व्यवहाराशी नाही जमले... पाहू आता पुढल्या जन्मी


पुरुष म्हणोनी खाल्या खस्ता स्त्रीलाही सुख कुठले 'एके'
घ्यावा कुठला जन्म न ठरले पाहू आता पुढल्या जन्मी


- ए. के. शेख
पनवेल

प्रतिसाद

आयुष्यच हे उधळुन दिधले प्रिय सखीवर माझे तरिही
प्रेम सखीला नाही कळले... पाहू आता पुढल्या जन्मी

छान...