तमा

आम्ही कशाला बाळगू कोणाची तमा इथे!
आम्ही सर्वांना केले इतीहास जमा इथे!


अहो, मंदीरे बुडाली तेव्हा चर्चा होती,
कोण्या देवाला करिती गाव परिक्रमा इथे?


तयांचे घाव झेलाया वेदना जवळ केल्या,
पाहुनी हृदयी कोरडे लाजल्या जखमा इथे!


गुन्ह्यात शामील सारे आरोपी कुणास म्हणू,
कराया आतूर सगळे मजलाही क्षमा इथे!


ऊरात सुर्य ऊगवला उदरी तो रणरणला
आता कोणालाच नको तारे चंद्रमा इथे!


श्वापदासमान माखली जरी तोंडं रक्तांनी,
तरी त्यांना द्यावयाची मानुसच उपमा इथे!


आयुष्याचा डाव हरलो श्वासाअंती कळले
जळतांनाही माझ्यावर सुरुच मुकदमा इथे!

गझल: 

प्रतिसाद

आयुष्याचा डाव हरलो श्वासाअंती कळले
जळतांनाही माझ्यावर सुरुच मुकदमा इथे!

 
 सुंदर सुंदर सुंदर
 
सुनिल देशमुख