प्रमोद खराडे यांची गझल...

वेदना जरी उरात या.. दिगंत
वाटतो परी जगास, भाग्यवंत

मी कुठे अशांत, एकटा, हताश
एक या उरात बोच, एक खंत

मिरवशील तू मला कुठे कशास
मी नसे तसा झकास शोभिवंत

ते जिथे, तिथे सुखात दैवजात
दुःख हे मला कसे असे अनंत

या मनात टळटळीत.. भरदुपार
या मनात.. एक तोतया वसंत

तू चुकून बहरलीस... डवरलीस
दरवळे किती अशात.. आसमंत

तू मला दिला दगा जुना फिरून
ही जखम नवी तरी मला पसंत


- प्रमोद खराडे

गझल: 

प्रतिसाद

प्रमोद खराडे यांची ही मला आवडलेली गझल मी येथे देत आहे..
वाचकांनाही ती नक्की आवडेल..
प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...
- जनार्दन

तू मला दिला दगा जुना फिरून
ही जखम नवी तरी मला पसंत
 खूपच छान
 
सुनिल देशमुख

विशेष आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

या मनात टळटळीत.. भरदुपार
या मनात.. एक तोतया वसंत
अतीसुंदर!

मी कुठे अशांत, एकटा, हताश
एक या उरात बोच, एक खंत
वा!
या मनात टळटळीत.. भरदुपार
या मनात.. एक तोतया वसंत
वा!

गझल एकंदर आवडलीच पण वरील शेर विशेष आवडले.