भेट

भेट


न पाहिले डोळे भरुनी तुला ना बोलले काही
तव भेटीची इच्छा मनास माझ्या जाळत राही


तुला भेटण्याला कितिक अंतर चालून आले  मी 
अशी गुंगले.. मैलांचा दगड मला दिसला नाही


चल निरोप घेऊ आपण दोघे या वळणावरती
भिन्न आपले मार्ग जरी बोलतील काहीबाही


सरली भरती अन् उरली मागे एकाकी रेती
काय अता चंद्राला मागावी प्रीतीची ग्वाही?

 त्या मुकुंदास कळवा माझा सांगावा  कुणीतरी
 'ये माघारी ', अजून तिथे  बासरीवेडी  राही


मला कळेना कशास करते उगा काळजी त्याची?
घर माझे माघारी माझी कधी न चिंता वाही!


- सोनाली जोशी


 

गझल: 

प्रतिसाद

न पाहिले डोळे भरुनी तुला ना बोलले काही
तव भेटीची इच्छा  मनास माझ्या जाळत राही
छान
तुला भेटण्याला कितिक अंतर चालून आले  मी 
अशी गुंगले.. मैलांचा दगड मला दिसला नाही
वा...
सरली भरती अन् उरली मागे एकाकी रेती
काय अता चंद्राला मागावी प्रीतीची ग्वाही?
वा...वा...
मला कळेना कशास करते उगा काळजी त्याची?
घर माझे माघारी माझी कधी न चिंता वाही!
मस्त

मैलाचा दगड आणि ग्वाही हे शेर आवडले!!

तुला भेटण्याला कितिक अंतर चालून आले  मी 
अशी गुंगले.. मैलांचा दगड मला दिसला नाही

आणि
मला कळेना कशास करते उगा काळजी त्याची?
घर माझे माघारी माझी कधी न चिंता वाही!

 
सुरेख शेर !!!

छान्..आवडली..
सरली भरती अन् उरली मागे एकाकी रेती
काय अता चंद्राला मागावी प्रीतीची ग्वाही?

 त्या मुकुंदास कळवा माझा सांगावा  कुणीतरी
 'ये माघारी ', अजून तिथे  बासरीवेडी  राहीमला कळेना कशास करते उगा काळजी त्याची?
घर माझे माघारी माझी कधी न चिंता वाही!

छान्..आवडली..
सरली भरती अन् उरली मागे एकाकी रेती
काय अता चंद्राला मागावी प्रीतीची ग्वाही?

 त्या मुकुंदास कळवा माझा सांगावा  कुणीतरी
 'ये माघारी ', अजून तिथे  बासरीवेडी  राहीमला कळेना कशास करते उगा काळजी त्याची?
घर माझे माघारी माझी कधी न चिंता वाही!