चूक........ अमित वाघ.
ईश्वरा तू खूप मोठी चूक केली...
का अशी निर्माण तू ही भूक केली...
व्यर्थ येथे सर्व माझ्या प्रेमलीला...
बासरीची शेवटी बंदूक केली...
दूर चाबी फेकली होती मनाची...
तू कशी उघडी पुन्हा संदूक केली..
शेवटीही खंत दु:खा हीच होती...
ऐनवेळी तूच वाचा मूक केली...
जीवनाची तेवती ठेवून देवा...
ज्योत डोळ्यांचीच का अंधूक केली...
.
.
.
वाहवा..! क्या बात है...! बढिया गजल...! पण,
या इथे वृत्तात थोडी चूक केली..!!!
अमित वाघ.
'गुरुमंदिर', सुधीर कॉलनी,अकोला-444001.
मो. नं. : 9850239882.
www.gazalnavihotanna.blogspot.com
www.gajalnahihotito.blogspot.com
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 12/06/2008 - 18:25
Permalink
दूर चाबी फेकली होती मनाची...
ईश्वरा तू खूप मोठी चूक केली...
का अशी निर्माण तू ही भूक केली...
छान!
दूर चाबी फेकली होती मनाची...
तू कशी उघडी पुन्हा संदूक केली..
वाव्वा!!
अमित, एकंदर गझल आवडली.
पुलस्ति
गुरु, 12/06/2008 - 18:59
Permalink
सुंदर!
सर्वच शेर आवडले अमित! बंदूक आणि संदूक तर विशेषच!!
मराठी रसिक
रवि, 15/06/2008 - 21:52
Permalink
बासरीची बंदूक
व्यर्थ येथे सर्व माझ्या प्रेमलीला...
बासरीची शेवटी बंदूक केली...
शेवटीही खंत दु:खा हीच होती...
ऐनवेळी तूच वाचा मूक केली...
छान !!