तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता
श्वास श्वास उन्मळून यावा अशी विलगता
खूप दूरवर नेते आहे तुझी तुटकता
आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी
तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता
किती दूरवर आलो आपण असे वाटते
वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता..
तुझ्याप्रमाणे जगेन मी ही ,तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वत्व बदलता ..?
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
अनंत ढवळे
गझल:
प्रतिसाद
प्रदीप कुलकर्णी
रवि, 25/05/2008 - 15:07
Permalink
वा...वा...
आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी
तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता
छान
किती दूरवर आलो आपण असे वाटते
वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता..
वा...वा...
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
सुंदर
पुलस्ति
रवि, 25/05/2008 - 16:53
Permalink
सुंदर!
गझल खूपच आवडली. आयुष्य आणि सहजता हे शेर तर विशेषच.
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
अगदी अंतर्मुख करणारा... फार फार सुंदर शेर. मनापासून धन्यवाद अनंतराव.
मराठी रसिक
सोम, 26/05/2008 - 22:51
Permalink
अप्रतिम !
गझलेतला भावार्थ मनास भावला.
श्वास उन्मळून यावा अशी विलगता
- बहोदही खू़ब !
चित्तरंजन भट
सोम, 26/05/2008 - 01:36
Permalink
अगदी हेच
अगदी हेच म्हणायचे होते आणि हेच म्हणतो.
सान्जेय
सोम, 23/06/2008 - 14:47
Permalink
मस्त!
मस्त!
साधी, सोपी, सुंदर........
-सान्जेय
सोनाली जोशी
गुरु, 26/06/2008 - 02:00
Permalink
वा
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
फारच सुरेख शेर
अजय अनंत जोशी
गुरु, 26/06/2008 - 11:55
Permalink
लाजवाब
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
that's the point.
अजय जोशी
सुधाकर कदम (not verified)
शुक्र, 04/07/2008 - 08:11
Permalink
गझल आवडली!
बापू दासरी
मंगळ, 15/07/2008 - 06:36
Permalink
छान
गझल खूपच आवडली. आयुष्य आणि सहजता हे शेर तर विशेषच.
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
क्या बात है.
चक्रपाणि
मंगळ, 15/07/2008 - 11:39
Permalink
कुठे कुठे बदलेन काय मी
विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!
वाव्वा!
- चक्रपाणि जीवन चिटणीस
रितेश भोईटे
मंगळ, 15/07/2008 - 14:05
Permalink
फारच सुंदर
फारच सुंदर गझल खुप आवडली
समीर चव्हाण (not verified)
रवि, 03/08/2008 - 12:25
Permalink
तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता
सुंदर...
कुमार जावडेकर
रवि, 03/08/2008 - 18:34
Permalink
वा!
अनंत,
गझल अतिशय सुंदर आहे - 'सहजता' आवडली. 'खूप दूरवर नेते आहे तुझी तुटकता...' अप्रतिम!
तुझ्याप्रमाणे जगेन मी ही ,तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वत्व बदलता ..? - वा!
मक्ताही आवडला.
- कुमार