तगमग
जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग
इथे किती गजर्याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
श्वास घेतला, जाणवली धग
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग
इथे किती गजर्याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
गझल:
प्रतिसाद
सोनाली जोशी
शुक्र, 16/05/2008 - 03:52
Permalink
वा
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
वा मस्त! हा आणि गजर्याची बोलीचा शेर मस्त.
गझल आवडली.
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 16/05/2008 - 15:45
Permalink
अप्रतिम शेर..
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
अप्रतिम शेर..
गझललेखनाला हार्दिक शुभेच्छा !
मधुघट
शुक्र, 16/05/2008 - 19:20
Permalink
छान
संपूर्ण गझलच छान आहे
प्रमोद बेजकर
शनि, 17/05/2008 - 16:15
Permalink
छान
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
हे शेर विशेष आवडले.
चित्तरंजन भट
बुध, 21/05/2008 - 15:47
Permalink
आधी किंवा आत्ता वा मग
जगण्यासाठी इतकी दगदग
श्वास घेतला, जाणवली धग
होकाराचे आढेवेढे!
आधी किंवा आत्ता वा मग
फुकट भाषणे, उधार वक्ते
विकत घेतले श्रोत्यांचे नग
इथे किती गजर्याची बोली?
इथे कशी पदराची लगबग?
सुचले नाही काही क्षणभर
नुसती तगमग तगमग तगमग
वा! गझल फार आवडली.