राज्य दुःखाचे...
.....................
राज्य दुःखाचे...
.....................
फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !
सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !
सुटे ती...पोचण्याआधीच मी
- अशी माझीच का गाडी हुके ?
पहाटेचीच त्याला ओढ का ?
पहाटेलाच का वेढी धुके ?
तिथे तो...तूच तू आहेस का ?
तिथे जो दूर तारा लुकलुके ?
उभे आयुष्य द्यावे लागले...
मिळाले अर्थ का कविते, फुके ?
पुन्हा स्वप्नात आली भाकरी..
कुणी माझ्यातले मेले भुके !
कधी मी एकदा चुकलो जरा...
स्मरे ती चूक अन् मी चुकचुके !
कधी शिकलास माणुसकी अशी ?
कधी शिकलास तू इतकी बुके ?
तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !
क्षमा मागायची का ? मागतो !
तुझे कोठे ? अरे, माझे चुके !!
तुझे ऐकेन मी काही कसे ?
जरी हाती तुझ्या हे दंडुके !
किती हे राज्य दुःखाचे बडे...
किती आहेत जिल्हे; तालुके !!
- प्रदीप कुलकर्णी
प्रतिसाद
जयन्ता५२
बुध, 07/05/2008 - 08:58
Permalink
कधी शिकलास 'गझल'की अशी ?
प्रदीप,
तुझ्या उत्तुंग प्रतिभेला दंडवत!
कधी शिकलास 'गझल'की अशी ?
कधी शिकलास तू लिहणे नेमके?
जयन्ता५२
चित्तरंजन भट
बुध, 07/05/2008 - 11:50
Permalink
तिला सांगायचे काहीतरी...
सुखे आहेत; दुःखेही तशी...
कधी ओले;कधी आहे सुके !
वाव्वा!!
तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !
वाव्वा!!
गझल सुरेख आहे.
प्रमोद हरदास
बुध, 07/05/2008 - 12:21
Permalink
सुंदरच...!!!
फुलांची फार झाली कौतुके !
कधीपासूनचे काटे मुके !
अप्रतिम...!!!
पुलस्ति
बुध, 07/05/2008 - 19:19
Permalink
वा!
चुकचुके, ओले-सुके, डहाळी आणि दु:खाचे राज्य शेर फार आवडले!!
मानस६
बुध, 07/05/2008 - 23:27
Permalink
समस्त..
समस्त काफिये आवडलेत...
पुन्हा स्वप्नात आली भाकरी..
कुणी माझ्यातले मेले भुके !
तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके !.. मस्तच
-मानस६
सोनाली जोशी
गुरु, 08/05/2008 - 19:12
Permalink
मस्त
क्षमा मागायची का ? मागतो !
तुझे कोठे ? अरे, माझे चुके !!
वा! गझल आवडली. काट्याचा शेरही मस्त.
योगेश वैद्य
रवि, 11/05/2008 - 15:43
Permalink
गझल
खूप आवडली.
योगेश वैद्य
रवि, 11/05/2008 - 15:41
Permalink
डहाळी
हा शेर काय येऊन गेलाय!सहजसुंदर!
वा..वा!
बापू दासरी
बुध, 14/05/2008 - 14:38
Permalink
वाहवा
तिला सांगायचे काहीतरी...
डहाळी साऱखी खाली झुके ! हा शेर खास : बापू
ॐकार
शुक्र, 16/05/2008 - 01:19
Permalink
डहाळी
काही शेर मुद्दाम लिहिल्यासारखे वाटतात जसे दंडुके, भुके, लुकलुके.. पण डहाळी आणि तालुक्यांचे शेर मात्र खास!