किंमत
Posted by अनिरुद्ध अभ्यंकर on Sunday, 4 May 2008
कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी खुळ्यागत लागलो वागायला
भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला
माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला
गझल:
प्रतिसाद
सतीश
रवि, 04/05/2008 - 09:56
Permalink
मतला छानच!
'बंद केले उमलायचे', 'आसवे लागली माजायला', आणि 'भूक' हे शेरही सुंदर!
-सतीश
पुलस्ति
रवि, 04/05/2008 - 19:37
Permalink
वा!
किंमत आणि आसवे हे शेर अप्रतिम आहेत!!
आसवे ही लागली माजायला -- क्या बात है!
प्रदीप कुलकर्णी
रवि, 04/05/2008 - 21:41
Permalink
जोरदार...
जोरदार गझल...
दिसायला साधी-सोपी; सुचायला अवघड, कळायला सुगम...गझलेत अशी किमया खूप कमीजणांना साध्य होते.
शुभेच्छा, अनिरुद्ध.
अनंत ढवळे
सोम, 12/05/2008 - 18:57
Permalink
काळजी
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
व्वा ! थेट ं मीरच्या वळणाचा शेर आहे..असे शेर अस्वस्थ करून जातात..
अनंत ढवळे
सोम, 12/05/2008 - 18:57
Permalink
काळजी
काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला
व्वा ! थेट ं मीरच्या वळणाचा शेर आहे..असे शेर अस्वस्थ करून जातात..
ॐकार
शुक्र, 16/05/2008 - 01:25
Permalink
मतला
आवडला.
अनिरुद्ध अभ्यंकर
बुध, 10/09/2008 - 13:44
Permalink
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर
भूषण कटककर
बुध, 10/09/2008 - 14:46
Permalink
अभ्यंकर साहेब
अभंकर साहेब,
माफ करा. गझल चांगली आहे. पण बहुतेक माझीच अभिरुची खास नसावी.